ओपो ने गेल्यावर्षी डिसेंबर मध्ये ओपो आर17 प्रो लॉन्च केला होता. तसेच लॉन्च नंतर फक्त तीन महिन्यांच्या आतच डिवाइसची किंमत कमी करण्यात आली आहे. कंपनी ने हा डिवाइस 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज सह 45,990 रुपयांमध्ये सादर केला होता.
91मोबाईल्सला रिटेल सोर्स कडून मिळालेल्या माहितीनुसार ओपो आर17 प्रो च्या किंमतीत 6,000 रुपयांची कपात करण्यात आली आहे. पण कंपनी ने या कपातीबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. या कपातीनंतर तुम्ही हा डिवाइस 39,990 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता.
4,230एमएएच बॅटरी असलेला रियलमी 3 फ्लिपकार्ट वर झाला लिस्ट, 4 मार्चला होईल लॉन्च
ओपो आर17 प्रो चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन पण ‘वी’ शेप की नॉच वाल्या वाटरड्रॉप डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. फोन मध्ये 6.4-इंचाचा फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 6 ने प्रोटेक्टेड आहे. या फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 91.5 टक्के आहे तसेच ओपो ने आपल्या या फोन मध्ये अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे.
हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो सह ओपो च्या ऑपरेटिंग सिस्टम कलर ओएस 5.2 सह सादर करण्यात आला आहे. ओपो आर17 प्रो 1.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या ऑक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 710 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रेनो 616 जीपीयू आहे. कंपनी ने आर17 प्रो 8जीबी पावर फुल रॅम मेमरी सह सादर केला आहे. तसेच फोन मध्ये 128जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.
फोटोग्राफी सेग्मेंट पाहता ओपो आर17 प्रो ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप सह लॉन्च झाला आहे. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह तीन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत ज्यात 12-मेगापिक्सल + 20-मेगापिक्सल + 3डी डेफ्थ सेंसर आहे. तसेच सेल्फी साठी या फोनच्या फ्रंट पॅनल वर 25-मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे ज्यात एआई ब्यूटी मोड आहे.














