Samsung Galaxy S21 सीरीज अनेक दिवस चर्चेचा विषय बनली आहे. कंपनीने अधिकृतपणे कोणतीही माहिती दिली नाही पण बोलले जात आहे कि या सीरीज अंतगर्त Samsung Galaxy S21, Samsung Galaxy S21 Plus आणि Samsung Galaxy S21 Ultra स्मार्टफोन लाॅन्च केले जातील. सॅमसंगने सध्या सीरीजच्या लाॅन्च डेटची माहिती दिली नाही पण एका ताजा रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि पुढील महिन्याच्या 14 तारखेला सॅमसंग गॅलेक्सी एस21 सीरीज टेक मंचावर येईल.
सॅमसंग गॅलेक्सी एस21 सीरीज संबंधित हि मोठी बातमी अँड्रॉइड अथाॅरिटी वेबसाइटने शेयर केली आहे. वेबसाइटने दावा केला आहे कि सॅमसंग येत्या 14 जानेवारीला टेक मंचावर आपली ‘गॅलेक्सी एस21’ सीरीज सादर करणार आहे. यादिवशी एक इंटरनेशनल लाॅन्च होईल आणि त्या मंचावरून वेगवेगळ्या बाजारांमध्ये हि सीरीज सादर केली जाईल. रिपोर्टनुसार 14 जानेवारीला लाॅन्च झाल्यानंतर हि सीरीज 29 जानेवारी पासून भारतात विक्रीसाठी उपलब्ध होईल.
Samsung Galaxy S21 सीरीज बद्दल या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे आंतरराष्ट्रीय बाजारात या सीरीज मध्ये क्वाॅलकाॅम स्नॅपड्रॅगॉन चिपसेट असेल तसेच भारतात हा सॅमसंगच्या एक्सनाॅस 2100 चिपसेट सह बाजारात येईल. ग्लोबल लाॅन्च नंतर हि सीरीज भारतात प्री-बुकिंगसाठी उपलब्ध होईल जिची विक्री 29 जानेवारी पासून सुरु होईल. रिपोर्टनुसार सॅमसंग एक्सक्लूसिव स्टोर वर आतापासून 2,000 रुपये देऊन सीरीजचा कोणताही स्मार्टफोन प्री-बुक केला जाऊ शकतो. सीरीजच्या लाॅन्च, किंमत आणि बुकिंग संबंधित ठोस माहितीसाठी आपल्याला सध्या सॅमसंगच्या अधिकृत माहितीची वाट बघावी लागले.
हे देखील वाचा : Nokia घेऊन येत आहे स्वस्त एंडराॅयड ‘गो’ स्मार्टफोन, 15 डिसेंबरला होईल लाॅन्च
सॅमसंग गॅलेक्सी एस21 ब्यूरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड्स (BIS) वर लिस्ट करण्यात आला आहे. गॅलेक्सी एस21 सीरीजचा एंट्री लेवल फोन SM-G991B मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे. Samsung Galaxy S21 बद्दल मागील एका रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले होते कि हा फोन 120हर्ट्ज रिफ्रेश रेट असलेल्या एफएचडी+ डिस्प्ले वर लाॅन्च होऊ शकतो जो एमोलेड पॅनल वर बनला असेल. तसेच, फोन 4,000mAh च्या बॅटरी सह कथितरित्या 25W पर्यंतच्या फास्ट चार्जिंग सपोर्ट सह येईल. पण मागील रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले होते कि स्मार्टफोन बॉक्स मध्ये चार्जर असणार नाही.
Samsung Galaxy S21 Ultra
लीकनुसार सॅमसंग गॅलेक्सी एस21 अल्ट्रा मध्ये 6.8-इंचाचा Dynamic AMOLED 2X डिस्प्ले असेल जो अँड्रॉइड 11-बेस्ड One UI 3.0 वर चालेल. फोन 108MP प्राइमरी रियर कॅमेरा आणि 40MP फ्रंट-फेसिंग कॅमेऱ्या सह येईल. सोबतच टिप्सटरने सांगितले आहे कि या फ्लॅगशिप फोन मध्ये 5,000mAh ची बॅटरी असेल. तसेच या फ्लॅगशिप फोन मध्ये हाई रिफ्रेश रेट स्क्रीन (144Hz) असू शकते. पण सध्या याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. येत्या काळात लवकरच फोन बद्दल अजून बरीच माहिती समोर येईल अशी शक्यता आहे.