8GB RAM सह लाँच झाला नवीन OPPO Reno 9A 5G फोन, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

Highlights

 • फोन जापान मध्ये लाँच झाला आहे.
 • हा सीरीजचा चौथा मॉडेल आहे.
 • ह्यात Snapdragon 695 दिला आहे.

ओप्पोनं नोव्हेंबर 2022 मध्ये आपली रेनो 9 सीरीज सादर करून OPPO Reno 9 5G, Reno 9 Pro आणि Reno 9 Pro+ स्मार्टफोन लाँच केले होते. आता अर्ध वर्ष गेल्यानंतर कंपनीनं ह्या सीरीजमध्ये आणखी एक नवीन मोबाइल जोडला आहे. ओप्पोनं जापानमध्ये नवीन Reno 9A 5G फोन लाँच केला आहे ज्याची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

OPPO Reno 9A 5G ची किंमत

ओप्पो रेनो 9ए 5जी फोन जापानमध्ये सिंगल मेमरी व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे जो 8जीबी रॅमसह 128जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. ह्या फोनची किंमत 40,656 येन आहे जी भारतीय करंसीनुसार 24,000 रुपयांच्या आसपास आहे. फोन Moon White आणि Night Black कलरमध्ये बाजारात आला आहे. विशेष म्हणजे हा फोन भारतात येण्याची शक्यता जवळपास नगण्य आहे.

OPPO Reno 9A 5G स्पेसिफिकेशन्स

 • 6.4″ FHD+ 90Hz Display
 • Qualcomm Snapdragon 695
 • 8GB RAM + 128GB Memory
 • 48MP Rear Camera
 • 16MP Selfie Sensor
 • 18W 4,500mAh Battery
 • स्क्रीन : ओप्पो रेनो 9ए 5जी फोन 2400 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.4 इंचाच्या फुलएचडी+ पंच-होल डिस्प्लेसह लाँच करण्यात आला आहे. ही स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे तसेच 90हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करते.
 • प्रोसेसर : OPPO Reno 9A 5G मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 2.2गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीडवर चालतो. हा मोबाइल फोन 8जीबी रॅमसह 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जे LPDDR4x आणि UFS 2.2 टेक्नॉलॉजीवर चालतात.
 • रियर कॅमेरा : फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ह्यात एफ/1.7 अपर्चर असलेल्या 48 मेगापिक्सलच्या प्रायमरी सेन्सरसह 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो सेन्सरचा समावेश आहे.
 • सेल्फी कॅमेरा : ओप्पो रेनो 9ए 5जी फोनच्या फ्रंट पॅनलवर 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.4 अपर्चरवर चालतो.
 • बॅटरी : पवार बॅकअपसाठी ह्या ओप्पो मोबाइलमध्ये 4,500एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच ही बॅटरी वेगानं से चार्ज करण्यासाठी रेनो 9ए मध्ये 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here