OPPO फॅन्ससाठी तो दिवस उजाडला ज्याची ते वाट बघत होते. कंपनीने आज भारतात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियोचा विस्तार करत ‘एफ19’ सीरीज सादर केली आहे. सीरीज सोबत दोन नवीन स्मार्टफोन लॉन्च केले गेले आहेत जे OPPO F19 Pro आणि OPPO F19 Pro Plus 5G नावाने आले आहेत. मोठी बॅटरी, 60हर्ट्ज एमोलेड डिस्प्ले, 48एमपी क्वॉड कॅमेरा आणि पावरफुल चिपसेट असलेली ही सीरीज स्टाईल आणि फोटोग्राफीसाठी शानदार असल्याचे बोलले जात आहे जी या महिन्यात बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होईल. ओपोने सांगितले आहे की येत्या काही दिवसांत OPPO F19 पण भारतात लॉन्च केला जाईल.
डिजाईन
OPPO F19 Pro आणि OPPO F19 Pro Plus 5G चा लुक बर्याच अंशी एकसारखे आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन बेजल लेस पंच-होल डिस्प्लेसह लॉन्च झाले आहेत. ज्यांच्या वर डाव्या कोपर्यात सेल्फी कॅमेरा होल आहे. दोन्ही स्मार्टफोन चौकोनी क्वॉड रियर कॅमेर्याला सपोर्ट करतात ज्यात एफ19 प्रो चे चारही सेंसर वर चौकोनी आकारात आहेत. तर एफ19 प्रो प्लसचे तीन सेंसर वर्टिकल शेपमध्ये आणि एक सेंसर बाजूला आहे. F19 Pro चे डायमेंशन 160.1*73.2*7.8 आणि वजन 172 ग्राम आहे तसेच F19 Pro+ चे डायमेंशन 16.01×7.34×0.78 आणि वजन 173 ग्राम आहे. कंपनीने एफ19 प्रो Fluid Black आणि Crystal Silver तसेच एफ19 प्रो प्लस Fluid Black आणि Space Silver कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे.
डिस्प्ले
OPPO F19 Pro आणि F19 Pro Plus दोघांचा लुक एकसारखा आहे. हे दोन्ही मोबाईल फोन्स 20:9 आस्पेक्ट रेशियोसह सादर केले गेले आहेत जे 2400 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.4 इंचाच्या एफएचडी+ एमोलेड पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतात. दोन्ही स्मार्टफोन्सची स्क्रीन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट 3.0 सेंसर टेक्नॉलॉजीसह येतात जे 60हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालतात. फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 90.8% आहे. तसेच ओपो फोनला कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ची सुरक्षा देण्यात आली आहे. ओपो एफ19 सीरीज चे हे फोन 408पीपीआई पिक्सल डेनसिटीला सपोर्ट करतात.
प्रोसेसिंग
OPPO ने आपले नवीन स्मार्टफोन्स एंडरॉयड 11 वर लॉन्च केले आहेत जे कलरओएस 11.1 सह काम करतात. तसेच प्रोसेसिंगसाठी या दोन्ही स्मार्टफोन्स मध्ये आक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. OPPO F19 Pro कंपनीने मीडियाटेक हीलियो पी95 चिपसेट वर लॉन्च करण्यात आला आहे तसेच OPPO F19 Pro+ मीडियाटेक च्या डायमनसिटी 800यू चिपसेटसह बाजारात आला आहे. विशेष म्हणजे ओपो एफ19 प्रो 4जीला सपोर्ट करतो तर ओपो एफ19 प्रो प्लस एक 5G फोन आहे.
कॅमेरा
फोटोग्राफीसाठी ओपोचे दोन्ही नवीन स्मार्टफोन क्वॉड रियर कॅमेर्याला सपोर्ट करतात ज्याचे सर्व सेंसर्स सारखे आहेत. स्मार्टफोन्सच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.7 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला
ज्या सोबत साथ एफ/2.2 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड एंगल लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची पोर्टरेट लेंस आणि तेवढ्याच अपर्चरची एक 2 मेगापिक्सलची मोनो लेंस आहे. सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी हा फोन एफ/2.4 अपर्चर असलेल्या16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेर्याला सपोर्ट करतात.
पावर बॅकअप
फोन च्या पावरफुल स्पेसिफिकेशन्सचा योग्य वापर तेव्हा करता येईल जेव्हा फोनची बॅटरी चांगली असेल. OPPO F19 Pro आणि OPPO F19 Pro Plus 5G स्मार्टफोन 4,310एमएएच च्या मोठ्या बॅटरीसह लॉन्च केले गेले आहेत. बॅटरी वेगाने चार्ज करण्यासाठी एफ19 प्रो मध्ये 30W VOOC Flash Charge 4.0 टेक्नोलॉजी देण्यात आली आहे तसेच एफ19 प्रो प्लस स्मार्टफोन 50W Flash Charge टेक्नोलॉजी सह आला आहे.
वेरिएंट्स व किंमत
OPPO F19 Pro दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे ज्यात बेस वेरिएंट 8 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो तसेच मोठ्या वेरिएंट मध्ये 8 जीबी रॅमसह 256 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. वेरिएंट्सची प्राइस क्रमश: 21,490 रुपये आणि 23,490 रुपये आहे. छोट्या वेरिएंटची विक्री 17 मार्च तर मोठ्या वेरिएंटचा सेल 25 मार्चपासून होईल.
तसेच OPPO F19 Pro Plus 5G ने 8 जीबी रॅम मेमरी + 128 जीबी इंटरनल स्टोरेज वर बाजारात आला आहे. या सर्व वेरिएंट्सची मेमरी माइक्रोएसडी कार्डने 256 जीबी पर्यंत वाढवता येते. किंमत पाहता ओपो एफ19 प्रो प्लस 25,990 रुपयांमध्ये बाजारात येईल. ज्याचा सेल 17 मार्च पासून सुरू होईल.
















