Vivo ने आज जगातील सर्वात मोठ्या मोबाईल बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतात आपली ‘एक्स60’ सीरीज सादर केली आहे. आपले शक्तिप्रदर्शन करत वीवोने एकसाथ तीन नवीन स्मार्टफोन भारतात लॉन्च केले आहेत ज्यात Vivo X60, Vivo X60 Pro आणि Vivo X60 Pro Plus चा समावेश आहे. आकर्षक लुक सोबतच हि सीरीज पावरफुल स्पेसिफिकेशन्स, दमदार कॅमेरा आणि ताकदवान बॅटरीसह आली आहे. सीरीजचा सर्वात मोठा मॉडेल वीवो एक्स60 प्रो प्लस आपल्या टाकीदेच्या जीवावर Apple व Samsung च्या फ्लॅगशिप डिवायसेज सोबतच वनप्लसच्या लेटेस्ट स्मार्टफोन OnePlus 9 Pro ला थेट टक्कर देतो.
डिजाईन
Vivo X60 Pro+ कंपनीने पंच-होल डिस्प्ले डिजाईनवर लॉन्च केला गेला आहे. फ्रंट पॅनलवर स्क्रीनच्या तीन कडा बेजललेस आहेत तसेच खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे. स्क्रीनच्या मध्यभागी सेल्फी कॅमेरा असलेला होल आहे. फोनचा डिस्प्ले SCHOTT Xensation® Up ने प्रोटेक्टेड आहे तसेच बॅक पॅनलसाठी Vegan leather मैटेरियलचा वापर केला आहे. हा फोन डायमेंशन 158.59×73.35×9.10एमएम आणि वजन 191ग्राम आहे
डिस्प्ले
वीवो एक्स60 प्रो प्लस कंपनीने 2376 X 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.56 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेवर लॉन्च केला गेला आहे. हि स्क्रीन एमोलेड पॅनलवर बनली आहे जी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करते. 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करणारा हा डिस्प्ले 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट, 398पीपीआई आणि 6000000:1 कॉन्ट्रास्ट रेशियो सारख्या फीचर्ससह येतो. फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 92.7 टक्के आहे.
प्रोसेसिंग
Vivo X60 Pro Plus लेटेस्ट अँड्रॉइड ओएस अँड्रॉइड 11 वर लॉन्च केला गेला आहे जो फनटच ओएस 11.1 सह चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये आक्टा-कोर (एक 2.842गीगाहर्ट्ज + तीन 2.419गीगाहर्ट्ज + चार 1.805गीगाहर्ट्ज) प्रोसेसेरसह 5नॅनोमीटर फेब्रिकेशनवर बनलेला क्वॉलकॉमचा पावरफुल स्नॅपड्रॅगॉन 888 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा फोन एड्रेनो 660 जीपीयूला सपोर्ट करतो.
रॅम व स्टोरेज
Vivo X60 Pro Plus भारतात एकाच वेरिएंटमध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा हा वेरिएंट 12 जीबी पावरफुल रॅमला सपोर्ट करतो जो LPDDR4X टेक्नॉलॉजीसह काम करतो. वीवोचा हा पावरफुल स्मार्टफोन 256 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जो UFS 3.1 स्टोरेज टेक्नॉलॉजीसह येतो.
कॅमेरा
वीवो एक्स60 प्रो प्लस क्वॉड रियर कॅमेऱ्यासह लॉन्च झाला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर फ्लॅश लाईटसह एफ/1.57 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा GN1 सेंसर देण्यात आला आहे जो vivo OIS टेक्नॉलॉजीसह चालतो. हा फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 48 मेगापिक्सलच्या Sony IMX598 सेकंडरी सेंसरला सपोर्ट करतो जो गिंबल स्टेबलाइजेशन टेक्नॉलॉजीसह येतो.
Vivo X60 Pro+ च्या रियर पॅनलवर एफ/2.08 अपर्चर असलेला 32 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि एफ/3.4 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची सुपर मॅक्रो लेंस देण्यात आली आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन एफ/2.45 अपर्चर असलेल्या 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
बॅटरी
Vivo X60 Pro Plus स्मार्टफोन पावरफुल बॅटरी सोबतच दमदार बॅटरीसाज पण येतो. कंपनीने आपला फोन 4,200एमएएच बॅटरीसह बाजारात आला आहे. मोठी बॅटरी वेगाने चार्ज करण्यासाठी यात 55वॉट फ्लॅशचार्ज टेक्नोलॉजी देण्यात आली आहे जी काही मिनिटांत फोनची बॅटरी 100 टक्के पर्यंत चार्ज करू शकते.
प्राइस व सेल
Vivo X60 Pro+ भारतात 69,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे जो Emperor Blue कलरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल. वीवो एक्स60 प्रो प्लसची प्री-बुकिंग आज म्हणजे 25 मार्चपासून सुरु झाली आहे आणि हा फोन येत्या 2 एप्रिलपासून विकत घेता येईल. वीवो एक्स60 प्रो प्लस कंपनीच्या अधिकृत वेबसाइट व शॉपिंग साइट सोबतच रिटेल स्टोर्स वर पण विक्रीसाठी उपलब्ध होईल.














