OPPO Reno 5 सीरीज कंपनीच्या हिट स्मार्टफोस सीरीजपैकी एक रही आहे. वेगवेगळ्या बाजारांमध्ये या सीरीज अंतगर्त Oppo Reno 5F, Oppo Reno 5, Oppo Reno 5 Pro आणि Oppo Reno 5 Pro+ सारखे स्मार्टफोन लॉन्च केले गेले आहेत जे आर्कषक लुक आणि शानदार स्पेसिफिकेशन्ससह येतात. ओपोने ग्लोबल मार्केटमध्ये आज पुन्हा या सीरीजचा विस्तार केला आहे. कंपनीने नवीन मोबाईल फोन Oppo Reno 5 Lite लॉन्च केला आहे जो 8 जीबी रॅम, 5G कनेक्टिविटी, क्चॉड कॅमेरा आणि लार्ज डिस्प्लेला सपोर्ट करतो. (oppo reno 5 lite 5g offcially launched specifications price)
Oppo Reno 5 Lite
ओपो रेनो 5 लाइट चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन पंच-होल डिस्प्ले डिजाईनवर लॉन्च केला गेला आहे. स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तसेच खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे. सेल्फी कॅमेरा असलेला होल स्क्रीनच्या उजव्या कोपऱ्यात आहे. Oppo Reno 5 Lite स्मार्टफोन 2400 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.43 इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो जो 60हर्ट्ज रिफ्रेश रेटसह काम करतो. ओपोचा हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरसह येतो.
फोटोग्राफी सेग्मेंट पाहता ओपो रेनो 5 लाइट क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.7 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि तेवढाच असलेली 2 मेगापिक्सलच्या मोनो लेंसला सपोर्ट करतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये एफ/1.7 अपर्चर असलेला 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
हे देखील वाचा : Samsung पुन्हा धमाल करण्याची तयारी, डबल फोल्डिंग स्मार्टफोन लवकरच करेल लॉन्च
Oppo Reno 5 Lite अँड्रॉइडच्या लेटेस्ट ओएस अँड्रॉइड 11 वर लॉन्च झाला आहे जो कलरओएस 11 सह चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसरसह 12नॅनोमीटर फेब्रिकेशनवर बनलेला मीडियाटेकचा हीलियो पी95 चिपसेट देण्यात आला आहे. ग्लोबल मार्केटमध्ये हा फोन 8 जीबी रॅमवर लॉन्च झाला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. ओपोने आपला फोन LPDDR4X रॅम सह सादर केला आहे आणि मेमरी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 256 पर्यंत वाढवता येते.
Oppo Reno 5 Lite एक डुअल सिम फोन आहे जो डुअल मोड 5जी सोबतच 4जी वोएलटीईला पण सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक आणि बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 4,310एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 30W VOOC फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते. फोनची आंतरराष्ट्रीय किंमत 25,000 रुपयांच्या आसपास आहे. हा फोन भारतीय बाजारात कधी पर्यंत लॉन्च होईल याबाबत काही सांगता येणार नाही.















