फ्लॅगशिप सेग्मेंटमध्ये धमाल करणारी टेक कंपनी Samsung सध्या लो बजेट सेग्मेंटमध्ये पण खूप आक्रमक झाल्याचे दिसत आहे. कारण भारतात सर्वात जास्त मागणी या सेग्मेंटच्या स्मार्टफोन्सची आहे. स्वस्त स्मार्टफोनची मागणी करणाऱ्या लोकांसाठी सॅमसंगने आज दोन नवीन फोन बाजारात आणले आहेत जे Samsung Galaxy F02s आणि Samsung Galaxy F12 नावाने मार्केटमध्ये आले आहेत. फक्त 8,999 रुपयांमध्ये लॉन्च झालेल्या कंपनीच्या Samsung Galaxy F02s ची संपूर्ण माहिती पुढे देण्यात आली आहे. (Samsung Galaxy F02s India Launch at Price rs 8999 Specs Sale Offer)
लुक व डिजाईन
Samsung Galaxy F02s ची फ्रंट डिजाईन तर गॅलेक्सी एफ12 सारखी आहे पण बॅक पॅनलवर डायमंड कट डिजाईन पॅटर्न बनवण्यात आला आहे. हा फोन वॉटरड्रॉप नॉच डिजाईनवर लॉन्च केला गेला आहे ज्यात स्क्रीनच्या तीन कडा बेजललेस आहेत तसेच खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे. सॅमसंगने याला इनफिनिटी ‘वी’ डिस्प्लेचे नाव दिले आहे. फोनच्या बॅक पॅनलवर उजवीकडे आयताकृती रियर कॅमेरा सेटअप बनवण्यात आला आहे ज्यात तीन कॅमेरा सेंसर वर्टिकल शेपमध्ये आहेत तर बाजूला फ्लॅश लाईट आहे. वॉल्यूम रॉकर आणि पावर बटण उजव्या पॅनलवर देण्यात आले आहेत तर डाव्या पॅनलवर सिम स्लॉट आहे.

फीचर्स व स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy F02s 20:9 आस्पेक्ट रेशियोवर सादर केला गेला आहे जो 720 x 1600 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ इनफिनिटी ‘वी’ डिस्प्लेला सपोर्ट करतो. सॅमसंग गॅलेक्सी एफ02एसने अँड्रॉइड 10 ओएस आधारित वन युआय 2.5 सह बाजारात एंट्री घेतली आहे जो 1.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसरसह क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 450 चिपसेटवर चालतो.
फोटोग्राफी सेग्मेंट पाहता गॅलेक्सी एफ02एस ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे, त्याचबरोबर 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
Samsung Galaxy F02s एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी फोनच्या साईड पॅनलवर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तर हा फोन फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे जी 15वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

वेरिएंट व प्राइस
Samsung Galaxy F02s ने दोन वेरिंएट्ससह मार्केटमध्ये एंट्री घेतली आहे. फोनचा बेस वेरिएंट 3 जीबी रॅमसह 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो ज्याची किंमत 8,999 रुपये आहे. तसेच फोनचा दुसरा वेरिएंट 9,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे जो 4 जीबी रॅमसह 64 जीबी की इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. हा फोन येत्या 9 एप्रिलपासून Diamond Blue, Diamond White आणि Diamond Black कलरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.














