सिंगल चार्जमध्ये 30KM पेक्षा जास्त रेंजसह आली Hero Lectro C4 इलेक्ट्रिक सायकल

Hero Cheapest Electric Cycle With 30KM Range In Just 5G Mobile Price

पेट्रोलचे दर गगनाला भिडले आहेत दरम्यान इलेक्ट्रिक सायकल (Electric Bicycle) सारख्या वाहनांच्या मागणीत वाढ होत आहे. त्यामुळे तुम्ही देखील कमी अंतर पार करण्यासाठी एखादी बॅटरी असलेली सायकल शोधत असाल तर आम्ही तुम्हाला Hero Lectro च्या एका शानदार ई-सायकलची माहिती देणार आहोत. Hero Lectro C4 सायकल ताशी 25 किलोमीटरचा टॉप स्पीड आणि 30 किलोमीटर पेक्षा जास्त रेंज देते.

Hero ची सर्वात स्वस्त बॅटरी असलेली सायकल

जर तुम्ही रोज 30 किलोमीटर पर्यंतचा प्रवास करत असाल तर पेट्रोल वाहनांपेक्षा इलेक्ट्रिक सायकल एक चांगला ऑप्शन ठरू शकतो. तुम्ही तुमची दैनंदिन कामे पूर्ण करण्यासाठी 1-2 लीटर पर्यंत पेट्रोल खर्च करत असाल तर अशा इलेक्ट्रिक वाहनांमुळे तुमचा पेट्रोलचा खर्च अर्ध्यापेक्षा कमी होईल. चला आता हीरोच्या या सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक सायकलची माहिती जाणून घेऊया. हे देखील वाचा: 5G Launch: 4 दिवसांनी सुरु होणार 5G सर्व्हिस? की त्यापेक्षा जास्त वेळ लागणार, जाणून घ्या

Hero Cheapest Electric Cycle With 30KM Range In Just 5G Mobile Price

Hero Lectro C4 ई-सायकल

ही स्टाइलिश ई-बाइक फक्त मजबूत नव्हे तर डिटॅचेबल बॅटरीसह येते, त्येमुळे ही चार्ज करणं आणि स्वॅप करणं सोपं आहे. ही फुल चार्ज करण्यास जवळपास 4 तासांचा वेळ लागतो. परंतु जर तुमच्याकडे दुसरी फुल चार्ज्ड बॅटरी असेल तर काही मिनिटांत तुम्ही नेक्स्ट ट्रिपसाठी रेडी होऊ शकता. सायकलच्या बॅटरीवर पाणी आणि धुळीचा परिणाम होत नाही कारण ही IP67 सर्टिफाइड आहे.

Hero Cheapest Electric Cycle With 30KM Range In Just 5G Mobile Price

5G मोबाइलच्या किंमतीत इलेक्ट्रिक सायकल

हिरोच्या या इलेक्ट्रिक सायकलची किंमत पाहता कंपनीच्या साइटवरील लिस्टिंगनुसार Hero Lectro C4 ची किंमत फक्त 28,999 रुपये आहे. म्हणजे तुम्हाला एक 5G Smartphone च्या किंमतीत एक इलेक्ट्रिक व्हेईकल विकत घेता येईल. तसेच तुम्ही ही सायकल क्रेडिट कार्डच्या मदतीनं No Cost EMI वर देखील विकत घेऊ शकता. हे देखील वाचा: 7,000mAh च्या दणकट बॅटरीसह नवीन Tecno Mobile ची एंट्री; फोनमध्ये 6GB RAM आणि 16MP Camera

भन्नाट फीचर्स

हीरो लेक्ट्रो सी4 मध्ये हँडलबारवर डावीकडे एक छोटासा वॉटरप्रूफ एलईडी डिस्प्ले यूनिट मिळतो, ज्यात तुम्हाला ऑन बटन आणि हेडलाइट सोबतच लो, मीडियम आणि हाय सारखे राइडिंग मोड दिसतात. तसेच यात ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीची सुविधा देखील तुम्हाला मिळते. तुम्ही हीरो लेक्ट्रो आयस्मार्ट अ‍ॅपच्या माध्यमातून यात राइड स्टेट, राइड ट्रॅकिंग सोबतच कंट्रोल्सचा देखील लाभ घेऊ शकता.

Hero Cheapest Electric Cycle With 30KM Range In Just 5G Mobile Price

हीरो लेक्ट्रो सी4 इलेक्ट्रिक सायकलमध्ये IP67 प्रोटेक्टेड Li-Ion 36 V,5.8Ah (IP67 protection) ची बॅटरी देण्यात आली आहे. जोडीला यात BLDC 36V/250W,40 Nm, Rear Hub Motor मिळते. ही बॅटरी एकदा फुल चार्ज केल्यावर तुम्ही 30 किलोमीटर पेक्षा जास्त रेंज मिळवू शकता. तसेच ही फुल चार्ज होण्यास 4 तास लागतात. हीरो लेक्ट्रो सी4 ताशी 25Kmph चा टॉप स्पीड गाठू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here