Motorola बाबत गेल्या आठवड्यातच एक बातमी आली होती कि लेनोवो अधिकृत हि कंपनी लवकरच भारतीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत दोन नवीन मोबाईल फोन लॉन्च करणार आहे. लीकमध्ये सांगण्यात आले होते कि हे दोन्ही स्मार्टफोन कंपनीच्या ‘जी’ सीरीजमध्ये जोडले जातील ज्यातील एकाचे नाव Moto G100 असू शकते. आता या मोबाईल फोन्सबद्दल नवीन अपडेट आला आहे ज्यात दावा केला गेला आहे हे दोन्ही मोटोरोला फोन भारतात Moto G60 आणि Moto G40 Fusion नावाने लॉन्च केले जातील. (Motorola Moto G60 and G40 fusion India launch soon with Snapdragon 732G soc)
Moto G60 आणि Moto G40 Fusion च्या इंडिया लॉन्चची माहिती टिपस्टर मुकुल शर्माने शेयर केली आहे. विशेष म्हणजे याच टिपस्टरने मागे मोटोरोला भारतात नवीन फोन लॉन्च करणार आहे अशी बातमी दिली होती. तसेच आता मुकुलने फोन्सच्या नावाचा खुलासा केला आहे. मोटोरोला इंडियाने अजूनतरी आपल्या नवीन प्रोडक्ट्स व लॉन्चबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही पण लीकनुसार मोटो जी60 आणि मोटो जी40 फ्यूजन लवकरच भारतीय बाजारात येतील. आशा आहे कि एप्रिलच्या शेवटपर्यंत हे फोन भारतात उपलब्ध होतील.
असे असतील स्पेसिफिकेशन्स
फोन्सच्या नावांसोबत Moto G60 आणि Moto G40 Fusion चे अनेक महत्वाचे स्पेसिफिकेशन्स पण टिपस्टरने शेयर केले आहेत. टिप मिळाली आहे कि मोटोरोला मोटो जी60 आणि मोटो जी40 फ्यूजन दोन्ही स्मार्टफोन्स क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 732जी चिपसेटसह बाजारात येतील. तसेच लीकमध्ये सांगण्यात आले आहे कि मोटो जी60 मध्ये 108 मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा सेंसर दिला जाईल तसेच अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि मॅक्रो लेंस पण मिळेल.
[Exclusive] Remember the 2 upcoming Motorola smartphones I talked about? I can now confirm that the two devices will be called Moto G60 and the Moto G40 Fusion. Both devices will be powered by the Snapdragon 732G chipset.
More to come
Feel free to retweet#NextMotoG pic.twitter.com/bPGsEr34Qd— Mukul Sharma (@stufflistings) April 12, 2021
Moto G60 मध्ये 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असल्याचे लीकमध्ये समोर आले आहे. तसेच दुसरीकडे Moto G40 Fusion बद्दल सांगण्यात आले आहे कि हा फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल ज्यात प्राइमरी सेंसर 64 मेगापिक्सलचा असेल. तसेच हा मोबाईल फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. या फोन्समध्ये 6.78 इंचाचा डिस्प्ले मिळू शकतो जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. तसेच पावर बॅकअपसाठी 6,000एमएएचची बॅटरी असल्याचे पण लीकमध्ये सांगण्यात आले आहे.
हे देखील वाचा : 6 जीबी रॅम आणि 5,000एमएएच बॅटरीसह लॉन्च झाला स्वस्त Vivo Y20s [G] स्मार्टफोन
Motorola ने आतापर्यंत भारतात आपले नवीन फोन लॉन्च करण्याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. त्यामुळे Moto G60 आणि Moto G40 Fusion कधी देशात लॉन्च होतील यासाठी कोणतीही टाईमलाईन मिळाली नाही. आशा आहे कि मोटोरोला येत्या काही दिवसांत आपला नवीन लॉन्च टीज करायला सुरुवात करेल आणि पुन्हा फोनची लॉन्च डेट पण घोषित करेल.














