WhatsApp Account Ban: WhatsApp नं जुलै महिन्यात आपल्या प्लॅटफॉर्मवरील सुमारे 2.3 मिलियन (23 लाख) अकाऊंट्स बॅन केले आहेत. व्हॉट्सअॅपनं जून महिन्यात सुमारे 22 लाख अकाऊंट्स बॅन केले होते. जर तुम्ही देखील व्हॉट्सअॅप वापरत असाल तर तुम्हाला माहित असलं पाहिजे की सोशल मेसेजिंग साइट WhatsApp दर महिन्याला प्लॅटफॉर्मवरील कोणते अकाऊंट्स करते आणि का. कंपनीनं वेगवेगळ्या युजर्सच्या तक्रारींच्या आधारावर हे अकाऊंट्स बॅन केले आहेत. एखाद्या युजरद्वारे कंप्लेन केल्यावर व्हॉट्सअॅप थेट अकाऊंट बॅन करत नाही. तर ते युजर्सकडून मिळणारा फीडबॅक आणि त्यांच्या स्पेसिलिस्टकडून डिटेलमध्ये अकाऊंटची माहिती गोळा करतात. त्यानंतर फेक न्यूज, सायबर सिक्योरिटी आणि निवडणुकांवर प्रभाव टाकणारे अकाऊंट्स बॅन केले जातात.
23 लाख अकाऊंट्स बॅन
व्हॉट्सअॅपनं स्टेटमेंटमधून सांगितलं आहे की त्यांना त्या अकाऊंट्सच्या विरोधात रिपोर्ट मिळाले होते जे प्लॅटफॉर्मचा वापर चुकीच्या पद्धतीने करत आहेत. व्हॉट्सअॅपचा वापर अनेक लोक इतरांना त्रास देण्यासाठी करत आहेत. रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की व्हॉट्सअॅपनं भारतात 23 लाख अकाऊंट्स भारतीय कायद्यानुसार व्हॉट्सअॅपच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे बॅन करण्यात आले आहेत.
WhatsApp नं सांगितलं की युजर्स सेफ्टी रिपोर्टमध्ये युजर्सकडून मिलेल्या तक्रारी आणि व्हॉट्सअॅपच्या कारवाईची माहिती मिळते. व्हॉट्सअॅपनं जुलैच्या महिन्यात 2.3 मिलियनपेक्षा जास्त खात्यांवर बंदी घातली आहे. हे देखील वाचा: रेडमी-रियलमीचं टेन्शन वाढलं; 3 वर्षांच्या वॉरंटीसह Nokia G60 5G लाँच; स्वस्तात 6GB RAM आणि 50MP कॅमेरा
WhatsApp वर रिपोर्ट कसा करायचा?
जर तुम्हाला एखादं अकाऊंट रिपोर्ट करायचं असेल तर तुम्हाला एक साधा ईमेल [email protected] वर पाठवावा लागेल. तसेच सोबत पुरावा म्हणून स्क्रिनशॉट जोडावा लागेल. अशाप्रकारे तुमच्यासोबत घडलेला गैरप्रकार तुम्ही व्हॉट्सअॅप पर्यंत पोहोचवू शकता आणि त्यावर कारवाई करण्याचे काम कंपनी करेल.
व्हॉट्सअॅपवर तुम्ही युजर्सना थेट ब्लॉक करू शकता. तसेच जर तुम्ही एखाद्या युजरला रिपोर्ट केलं तर व्हॉट्सअॅप तुम्हाला शेवटचे पाच मेसेज शेयर करण्यास सांगेल. अकाऊंट रिपोर्ट करताच तुम्हाला एक युजर आयडी देखील मिळेल. हे देखील वाचा: अॅडव्हान्स फीचर्स, स्पेसिफिकेशन्ससह आला Nokia X30 5G; कंपनीनं केला पर्यावरणपूरक मटेरियलचा वापर
या चुका केल्यास अकाऊंट होईल बॅन
- दुसऱ्या व्यक्तीचं फेक अकॉउंट बनवल्यास तुमचं Whatsapp तुमचं अकॉउंट बॅन होईल.
- कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये नसलेल्या व्यक्तीला खूप जास्त मेसेज पाठवल्यास Whatsapp अकॉउंट गमवावं लागू शकतं.
- WhatsApp Delta, GBWhatsApp, WhatsApp Plus इत्यादी थर्ड पार्टी अॅपचा वापर करणाऱ्यांवर बॅनची कारवाई केली जाऊ शकते.
- जर तुम्हाला जास्त युजर्सनी ब्लॉक केल्यावर देखील तुमचं Whatsapp अकॉउंट बॅन होऊ शकतं.
- तुमच्या WhatsApp अकॉउंट विरोधात अनेक लोकांनी रिपोर्ट फाईल केला तर कंपनीला बॅनची कारवाई करावी लागते.
- मालवेयर किंवा फिशिंग लिंक पाठवणारे युजर देखील प्लॅटफॉर्मवर ठेवले जात नाहीत.
- Whatsapp वर अश्लील क्लिप, धमकी किंवा अपमानकारक मेसेज पाठवणारे देखील बॅन होतात.
- Whatsapp वर हिंसेला प्रोत्साहन देणारे खोटे मेसेज किंवा व्हिडीओ पाठवणारे अकॉउंट देखील बॅन केले जातात.