Lenovo Legion Y70 गेमिंग स्मार्टफोन चीनमध्ये लाँच झाला आहे. लेनोवोनं होम मार्केट चीनमध्ये या गेमिंग स्मार्टफोनसह अँड्रॉइड टॅबलेट Xiaoxin Pad Pro 2022 देखील लाँच केला आहे. लेनोवोचा गेमिंग स्मार्टफोन Legion Y70 क्वॉलकॉमच्या सर्वात पावरफुल प्रोसेसर Snapdragon 8+ Gen 1 सह बाजारात सादर करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर या गेमिंग फोनमध्ये 10 लेयर कूलिंग सिस्टम आणि फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील देण्यात आला आहे. पुढे आम्ही तुम्हाला लेनोवोच्या नव्याकोऱ्या गेमिंग स्मार्टफोनची सविस्तर माहिती दिली आहे.
Lenovo Legion Y70 स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स
Lenovo Legion Y70 स्मार्टफोनमध्ये 6.67-इंचाची फ्लॅट स्क्रीन देण्यात आली आहे. या फोनमध्ये पंच होल कॅमेरा कटआउट मिळते. फोनच्या डिस्प्लेचे रिजोल्यूशन FHD+ रिफ्रेश रेट, 144Hz आहे, जो HDR10+, Dolby Vision आणि 1000 निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करतो. लेनोवोच्या या गेमिंग स्मार्टफोनमध्ये बॉक्सी डिजाईन देण्यात आली आहे, जो एव्हीएशन ग्रेड अॅल्युमिनियम मटेरियल आणि CNC-कर्व मेटल मिडल फ्रेमसह तयार करण्यात आला आहे. हे देखील वाचा: Oppo नं केली केली कमाल! 13GB रॅमसह लाँच केला भन्नाट स्मार्टफोन; 4,500mAh बॅटरीसह मिळतेय 33W फास्ट चार्जिंग
Lenovo Legion Y70 स्मार्टफोनच्या रियर पॅनलवर आयताकृती कॅमेरा मॉड्यूल देण्यात आला आहे. ज्यात ट्रिपल कॅमेरा सेटअप 50MP च्या प्रायमरी कॅमेऱ्यासह मिळतो. सोबतीला 13MP ची सेकंडरी लेन्स आणि 2MP चा तिसरा कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी कंपनीनं फोनच्या फ्रंटला 16MP चा सेल्फी कॅमेरा दिला आहे.
Lenovo Legion Y70 फोनमध्ये क्वॉलकॉमचा Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये 12GB पर्यंतचा रॅम आणि 256GB स्टोरेज देण्यात आली आहे. लेनोवोच्या गेमिंग स्मार्टफोनमध्ये मोठा व्हेपर चेंबर आणि 10 लेयर हीट डिसपेशन मॅकॅनिज्म देण्यात आलं आहे. यात 5100mAh ची बॅटरी 68W फास्ट चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे. Lenovo Legion Y70 फोन Android 12 वर आधारित ZUI 14 वर चालतो. हे देखील वाचा: Jio-Airtel ची डोकेदुखी वाढवणारी BSNL ची जबरदस्त ऑफर; या दोन रिचार्जवर मिळतोय अतिरिक्त 75GB डेटा
Lenovo Legion Y70 किंमत
Lenovo Legion Y70 स्मार्टफोन आइस व्हाइट, टाइटेनियम ग्रे आणि फ्लॅम रेड कलर ऑप्शनमध्ये सादर करण्यात आला आहे. या स्मार्टफोनचा बेस व्हेरिएंट 8GB रॅम व 128GB स्टोरेजसह 2,970 युआन (सुमारे 35,000 रुपये) मध्ये सादर करण्यात आला आहे. तसेच 12GB रॅम व 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 3,370 युआन (सुमारे 39,500 रुपये) आहे. तर स्मार्टफोनचा टॉप व्हेरिएंट 16GB रॅम व 512GB स्टोरेजसह 4,270 युआन (सुमारे 50,000 रुपये) मध्ये लाँच करण्यात आला आहे. या फोनची विक्री चीनमध्ये 22 ऑगस्टपासून सुरु होईल, परंतु भारतीय लाँच बाबत कोणतीही माहिती कंपनीनं दिली नाही.