मोटोरोला घेऊन येत आहे 4,000एमएएच बॅटरी आणि बेजल लेस डिस्प्ले वाला स्वस्त स्मार्टफोन मोटो ई5, शाओमीला मिळेल टक्कर

मोटोरोला ने एप्रिल मध्ये आपली नवीन ‘जी6 सीरीज’ आणि ‘ई5 सीरीज’ अंर्तराष्ट्रीय मंचावर सादर केली होती. मोटोरोला ने हे स्मार्टफोन ब्राजील मध्ये लॉन्च केले होते. कंपनी ने आपल्या ई सीरीज मध्ये एक साथ मोटो ई5, मोटो ई5 प्लस आणि मोटो ई5 प्ले स्मार्टफोन जोडले होते. कमी किंमतीत आणि शानदार स्पेसिफिकेशन्स असलेले हे स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारात येणार आहेत. मोटो ई5 ची रिटेल होर्डिंग दिल्ली मध्ये दिसली आहे त्यामुळे स्पष्ट झाले आहे की मोटोरोला आपला नवीन स्मार्टफोन ई5 लवकरच देशात लॉन्च करेल.

टेक पीपी वेबसाइट ने राजधानी दिल्लीत एका रिटेल स्टोर बाहेर लागलेल्या मोटो ई5 स्मार्टफोन ची होर्डिंग बघितली आहे आणि याचा फोटो इंटरनेट वर शेयर केला आहे. ही होर्डिंग समोर आल्याने हे स्पष्ट झाले आहे की कंपनी लवकरच हा स्मार्टफोन भारतात लॉन्च करेल आणि हा स्मार्टफोन आॅफलाईन चॅनल वर पण सेल साठी उपलब्ध होईल. या होर्डिंग मध्ये ‘हॅलो इंटरटेनमेंट’ सोबत न्यू मोटो ई5 लिहिण्यात आले आहे. तसेच मोटो ई5 चे स्पेसिफिकेशन्स म्हणून 4,000एमएएच बॅटरी आणि 18:9 मॅक्स विजन डिस्प्ले पण सांगण्यात आले आहे.

मोटो ई5 पाहता ब्रा​जील मध्ये हा स्मार्टफोन 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या 5.7-इंचाच्या डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे जो 1440 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन ला सपोर्ट करतो. हा फोन स्टॉक एंडरॉयड 8.0 ओरियो आधारित आहे तसेच क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 425 चिपसेट वर चालतो. कंपनी ने या फोन मध्ये 2जीबी रॅम मेमरी आणि 16जीबी इंटरनल स्टोरेज दिली आहे जी 256जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी साठी मोटो ई5 च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह एफ/2.0 अपर्चर वाला 13-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तर सेल्फी साठी या फोन एलईडी फ्लॅश सपोर्ट वाला 5-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. फोन च्या बॅक पॅनल वरील मोटो लोगो फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडिड आहे तसेच पावर बॅकअप साठी यात 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी अमेजॉन इंडिया ने पण मोटो ई5 आपल्या वेबसाइट वर लिस्ट केला होता. तिथे मोटो ई5 फ्लॅश ग्रे कलर वेरिएंट मध्ये लिस्ट झाला होता आणि याची किंमत 10,700 च्या आसपास सांगण्यात आली होती. पण हा फोन कोणत्या तारखेला भारतात लॉन्च केला जाईल आणि देशात याची किंमत काय असेल यासाठी कंपनी च्या आॅफिशियल घोषणेची वाट बघितली जात आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here