OnePlus बद्दल गेले कित्येक दिवस चर्चेत राहिली आहे, कंपनी आपल्या नंबर सीरीजमध्ये नवीन स्मार्टफोन जोडण्याची तयारी करत आहे जो OnePlus 10T 5G नावानं लाँच होईल. OnePlus 10 series मध्ये येणाऱ्या मोबाईल फोनबद्दल गेल्या काही दिवसांपासून अनेक प्रकारचे लीक्स समोर आले आहेत ज्यात फोनच्या लुक, डिजाईन व स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे. आता ताज्या लीकनुसार, OnePlus 10T 5G स्मार्टफोनच्या इंडिया लाँच डेटचा देखील खुलासा झाला आहे. बातमीनुसार वनप्लस 10टी 5जी फोन 3 ऑगस्टला भारतात लाँच होईल.
OnePlus 10T 5G चा भारतीय लाँच
वनप्लस 10टी 5जी फोनच्या इंडिया लाँचची माहिती देखील सध्या लीकच्या माध्यमातूनच समोर आली आहे. मोबाईलस्टॉक नावाच्या वेबसाईटनं आपल्या रिपोर्टमध्ये दावा केला आहे की वनप्लस कंपनी येत्या 3 ऑगस्टला भारतात एक मोठ्या इव्हेंटचं आयोजन करेल आणि या इव्हेंटच्या मंचावरून OnePlus 10T 5G फोन भारतीय बाजारात येईल. कंपनीनं आतापर्यंत वनप्लस 10टी 5जी फोनबद्दल अधिकृत घोषणा केली नाही परंतु आशा आहे की कंपनी लवकरच ऑफिशियल लाँच डेटची घोषणा करेल.
OnePlus 10T 5G बद्दल बोलले जात आहे की भारतीय बाजारात हा स्मार्टफोन तीन व्हेरिएंट्समध्ये एंट्री घेईल. यातील सर्वात छोट्या मॉडेलमध्ये 8GB RAM व 128GB Storage देण्यात येईल. तर दुसऱ्या व्हेरिएंटमध्ये 12GB RAM व 256GB Storage तसेच सर्वात मोठ्या वनप्लस 10टी 5जी मॉडेलमध्ये 16GB RAM + 512GB Storage देण्यात येईल. असं सांगण्यात आलं आहे की वनप्लस 10टी 5जी फोन Moonstone Black आणि Jade Green कलरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकतो.
OnePlus 10T 5G चे स्पेसिफिकेशन्स
वनप्लस 10टी 5जी फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता या स्मार्टफोनमध्ये 6.7-inch Fluid AMOLED डिस्प्ले दिली जाऊ शकते जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालेल. तसेच प्रोसेसिंगसाठी या मोबाईल फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 चिपसेट असण्याची बातमी आली आहे. जो आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली क्वॉलकॉमचा चिपसेट असेल.
फोटोग्राफीसाठी OnePlus 10T 5G फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो ज्यात एफ/1.8 अपर्चर असलेल्या 50MP IMX766 प्रायमरी सेन्सरसह 8MP ultrawide आणि 2MP macro लेन्सचा समावेश आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा मोबाईल फोन 16MP Selfie कॅमेऱ्यासह येईल. पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 150W fast charging सपोर्ट असलेली 4,800mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते.
OnePlus 10T ची संभाव्य किंमत
OnePlus 10T स्मार्टफोनच्या 8GB रॅम व्हेरिएंटची किंमत समोर आली आहे. त्यानुसार हा फोन 799 यूरो (सुमारे 65,300 रुपये) मध्ये सादर केला जाऊ शकतो. तसेच कंपनी हा डिवाइस मूनस्टोन ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये सादर करू शकते. वनप्लसच्या या फोनच्या रिटेल बॉक्समध्ये चार्जर, यूएसबी केबल, फोन केस आणि सिम इजेक्टर टूल दिला जाईल. OnePlus 10T स्मार्टफोन पुढील महिन्यात अर्थात ऑगस्टमध्ये भारतीयांच्या सेवेत दाखल होऊ शकतो.
















