Airtel युजर्सना निराश होण्याचं कारण नाही; लवकरच येतंय Airtel 5G, स्वतः Sunil Mittal यांनी केली घोषणा

भारतात 5G सर्व्हिस लवकरच सुरु होणार आहे, याबाबत सरकार सोबतच टेलीकॉम कंपन्यांनी देखील हिंट दिल्या आहेत. लाँच डेट मात्र अजून ठरली नाही परंतु आता Airtel 5G लाँच बद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. भारती इंटरप्रायजेसचे चेयरमन सुनिल मित्तल (Sunil Mittal) यांनी Bharti Airtel च्या भारतातील 5G सर्व्हिसच्या लाँचची माहिती दिली आहे. चला जाणून घेऊया Airtel 5G SIM, Airtel 5G Plan आणि Airtel 5G Service कधी ग्राहकांसाठी उपलब्ध होईल.

लवकरच Airtel 5G होणार लाँच

India Today ला दिलेल्या एका मुलाखतीत Sunil Mittal यांनी माहिती दिली की Airtel 5G ऑक्टोबर पर्यंत लाइव्ह केलं जाईल. परंतु या मुलाखती दरम्यान त्यांनी कोणत्याही विशिष्ट तारीख सांगितली नाही. आपल्या मुलाखतीत सुनिल मित्तल यांनी सांगितलं की, पाश्चिमात्य जगात 5G नं पाय पसरायला सुरुवात केली आहे. भारतात काही लोकांना वाटत की 5जीच्या बाबतीत भारत मागे राहिला आहे, परंतु असं नाही.

भारतात 5G येण्याची योग्य वेळ

ते म्हणाले की, भारतात 5जी सर्व्हिसला उशीर झालेला नाही, तर ही अगदी योग्य वेळ आहे. भारतातातील 5G डिवाइसच्या किंमती कमी झाल्याचं देखील त्यांनी निदर्शनास आणून दिलं. त्यामुळे भारतात 5G सर्व्हिस लाँच करण्याची योग्य वेळ आहे, असं त्यांना वाटत.

24 महिन्यांपासून सुरु आहे Airtel 5G ची तयारी

सुनिल मित्तल पुढे म्हणाले की, एयरटेल 5G रोलआउटची तयारी गेल्या जवळपास 24 महिन्यांपासून केली जात आहे. आमच्या अंदाजानुसार आम्ही 2022 च्या उत्तरार्धात ही लाँच करू. परंतु काही प्रतिस्पर्ध्यांना वाटत होतं की भारतात 5जीची सुरुवात 2020 च्या अखेरीस किंवा 2021 मध्ये केली जाईल.

Airtel 5G रिचार्ज प्लॅन स्वस्त असतील की महाग

अलीकडेच भारती एंटरप्राइजेज (Bharti Enterprises) चे vice-chairman Akhil Gupta यांनी सांगितलं होतं की जरी कंपनी प्रमुख सुपरफास्ट नेटवर्कसाठी प्रीमियम घेऊ शकत नाही, परंतु जास्त किंमतीचे टॅरिफ बाजारात येऊ शकतात. यावरून ग्राहकांनी समजून जावं की येत्या काळात Airtel 5G Recharge Plan ची किंमत जास्त असू शकते.

Jio च्या 5G सर्व्हिसची झाली घोषणा

Reliance Industries नं 29 ऑगस्टला आपल्या 45व्या अ‍ॅन्युअल जनरल मीटिंग (AGM) मधून आपल्या 5G सर्व्हिसची घोषणा केली आहे. ही सेवा यंदा दिवाळीत चार मेट्रो शहरांमध्ये लाँच केली जाईल. तर पुढील वर्षी डिसेंबर पर्यंत संपूर्ण देशात Jio 5G पोहोचेल, असा दावा कंपनीनं केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here