स्वस्तात 12GB रॅम असलेला फोन हवा? दोन-दोन बॅटरी सेलसह होणार iQOO Z6 ची एंट्री, इतकी असेल किंमत

iQOO ब्रँडची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. विवोचा हा सब-ब्रँड कमी किंमतीत भन्नाट स्पेक्स देण्यासाठी ओळखला जात आहे. ब्रँड आपले स्मार्टफोन गेमिंग स्मार्टफोन म्हणून ग्राहकांसमोर ठेवत असल्यामुळे तरुणाईचा कल या हँडसेटकडे जास्त आहे. आता iQOO नं कंफर्म केलं आहे की होम मार्केट चीनमध्ये iQOO Z6 स्मार्टफोन 26 ऑगस्टला लाँच केला जाईल. कंपनीनं आपल्या स्मार्टफोनची रियर डिजाइन अनेकदा टीज केली आहे. त्याचबरोबर आयकूचा हा स्मार्टफोन ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायजेशन (OIS) आणि 80W फास्ट चार्जिंगसह सादर केला जाईल. TechGoing नं हा आगामी स्मार्टफोन China Telecom च्या लिस्टिंगमध्ये स्पॉट केला आहे. या लिस्टिंगमधून फोनच्या डिजाइन, फुल स्पेसिफिकेशन्स, व्हेरिएंट्स आणि किंमतीची माहिती मिळाली आहे.

iQOO Z6 चे लीक स्पेसिफिकेशन्स

China Telecom वरील लिस्टिंगनुसार, iQOO Z6 स्मार्टफोनचा आकार 164.17 x 75.8 x 8.59mm आणि वजन 194.6 ग्राम आहे. आयकूचा हा स्मार्टफोन 6.64-इंचाच्या LCD स्क्रीनसह बाजारात येईल. या फोनच्या डिस्प्लेचं रिजोल्यूशन Full HD+ (2388 x 1080 पिक्सल) असेल. हा फोन 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. आयकूचा हा फोन Qualcomm च्या चिपसेटसह सादर केला जाण्याची शक्यता आहे. स्मार्टफोनमध्ये Snapdragon 778G Plus चिपसेट मिळू शकतो. या फोनमध्ये 12GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकतो. हे देखील वाचा: रेडमी-रियलमीला धोबीपछाड देणार! OnePlus Nord 3 आणि Nord Watch येतायत भारतात

iQOO Z6 स्मार्टफोनमध्ये 4,500mAh ची बॅटरी मिळेल, जी 80W फास्ट चार्जिंगसह सादर केली जाईल. iQOO च्या या फोनमध्ये ड्युअल सेल बॅटरी मिळेल, ज्यामुळे फास्ट चार्जिंगचा लोड एकाच बॅटरीवर येणार नाही. हा फोन फक्त 10 मिनिटांत 0 ते 50 टक्के चार्ज करता येईल. या फोनमध्ये साइड-फेसिंग फिंगरप्रिंट सेन्सर आणि 3.5mm ऑडियो जॅक मिळेल. हे देखील वाचा: चिनी कंपन्यांना झटका देण्यासाठी Asus 9z भारतात या दिवशी होऊ शकतो लाँच; जाणून घ्या किंमत

iQOO Z6 संभाव्य किंमत

iQOO Z6 स्मार्टफोनचे तीन व्हेरिएंट चीनमध्ये सादर केले जाऊ शकतात. या फोनचा बेस व्हेरिएंट 8GB RAM + 128GB स्टोरेजसह 1,899 युआन (सुमारे 22,150 रुपये) मध्ये सादर केला जाईल. तर 8GB RAM + 256 GB स्टोरेज 2,099 युआन (सुमारे 24,500 रुपये) मध्ये लाँच होईल. या स्मार्टफोनचा टॉप व्हेरिएंट 12GB RAM + 256GB स्टोरेजसह 2,299 युआन (सुमारे 26,800 रुपये) मध्ये विकत घेता येईल. हा फोन झेड ब्लॅक, स्टार ब्लू आणि गोल्डन ऑरेंज कलर व्हेरिएंटमध्ये ग्राहकांच्या भेटीला येईल. चीनमध्ये लाँच झाल्यानंतर कंपनी हा स्मार्टफोन भारतात देखील सादर करू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here