iPhone 13 ला धोबीपछाड देणारा फोन आला भारतात; परवडणाऱ्या किंमतीत दणकट Redmi K50i लाँच

Xiaomi नं आपल्या रेडमी ब्रँड अंतर्गत प्रीमियम K सीरीजचे स्मार्टफोन पुन्हा सादर करण्यास सुरुवात केली आहे. 2019 मध्ये आलेल्या Redmi K20 सीरिजनंतर आता भारतात Redmi K50i स्मार्टफोनची एंट्री झाली आहे. रेडमीचा हा स्मार्टफोन मीडियाटेक डायमेन्सिटी 8100 चिपसेटसह सादर करण्यात आला आहे. तसेच यात फोटोग्राफीसाठी 64MP ट्रिपल रियर कॅमेरा मिळतो. कंपनीनं 67W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5080mAh ची बॅटरी देखील दिली आहे. विशेष म्हणजे या स्मार्टफोननं काही दिवसांपूर्वी AnTuTu बेंचमार्क स्कोरमध्ये Apple च्या लेटेस्ट iPhone 13 ला मात दिली होती.

Redmi K50i 5G ची किंमत

Redmi K50i 5G स्मार्टफोनचे भारतात दोन व्हेरिएंट आले आहेत. या फोनचा 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेल 25,999 रुपयांमध्ये सादर करण्यात आला आहे. तर हायएंड व्हेरिएंटमध्ये 8GB रॅमसह 256GB स्टोरेज मिळते, ज्याची किंमत 28,999 रुपये आहे. हा फोन फँटम ब्लू, स्टील्थ ब्लॅक आणि क्विक सिल्वर कलर ऑप्शनमध्ये विकत घेता येईल. हे देखील वाचा: Electric Car सेगमेंटमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी येतेय Xiaomi; स्वस्तात मिळणार ‘ऑटोमॅटिक’ चालणारी कार

Redmi K50i 5G स्मार्टफोनची विक्री 23 जुलैपासून अ‍ॅमेझॉनवर Prime Day 2022 पासून सुरु होईल. तसेच रेडमीचा हा फोन शाओमीच्या अधिकृत वेबसाईट्ससह रिटेल स्टोरवरून देखील विकत घेता येईल. लाँच ऑफर अंतर्गत ICICI आणि SBI बँकेच्या कार्डवर 10 टाक्यांचा डिस्काउंट मिळत आहे.

Redmi K50i चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.6 इंच FHD+ LCD डिस्प्ले (रिफ्रेश रेट 30-144Hz)
  • 6/8 GB LPDDR5 रॅम
  • 128/256 GB UFS3.1 स्टोरेज
  • 64MP+8MP+2MP रियर कॅमेरा
  • 16MP फ्रंट कॅमेरा
  • 5080mAh बॅटरी 67W फास्ट चार्जिंग
  • Mediatek Dimensity 8100 प्रोसेसर

Redmi K50i 5G स्मार्टफोनमध्ये 6.6-इंचाचा Full-HD+ LCD पॅनल देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 144Hz आणि टच सॅम्पलिंग रेट 270Hz आहे. हा डिस्प्ले Dolby Vision, 650 निट्स ब्राईटनेस आणि HDR10+ ला सपोर्ट करतो. कंपनीनं डिस्प्लेला Corning Gorilla Glass 5 ची सुरक्षा दिली आहे. कनेक्टिव्हिटी फोनमध्ये 3.5mm हेडफोन जॅक, साईड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर, IR ब्लास्टर, ड्युअल स्टीरियो स्पिकर, Dolby Atoms, आणि लिक्विड कूलिंग 2.0 टेक्नॉलॉजी देण्यात आला आहे.

हा फोन Android 12 आधारित MIUI वर चालतो. फोनमध्ये MediaTek Dimensity 8100 चिपसेटची प्रोसेसिंग पावर मिळते. सोबतीला 8GB LPDDR5 RAM आणि 256GB UFS 3.1 स्टोरेज देण्यात आली आहे. फोनमध्ये स्टोरेजसाठी मायक्रोएसडी कार्ड स्लॉट देण्यात आला आहे. हे देखील वाचा: वजनाने हलका, फीचर्सनी शक्तिशाली! पूर्ण झाली Xiaomi 12 Lite च्या लाँचची तयारी

फोटोग्राफीसाठी Redmi K50i 5G स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यात 64MP चा प्रायमरी कॅमेरा आहे जो Samsung GW1 सेन्सर आहे. प्रायमरी कॅमेरा सेन्सरसह 8MP चा अल्ट्रा-वाईड कॅमेरा आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा मिळतो. रेडमीच्या या फोनमध्ये सेल्फीसाठी 8MP चा फ्रंट कॅमेरा आहे. यातील 5,080mAh ची बॅटरी 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here