यंदाही दरवाढीपासून सुटका नाही! एयरटेलचे रिचार्ज प्लॅन महागणार; सुनिल मित्तलनी दिला इशारा

Highlights

  • एयरटेल यंदा सर्व प्लॅनचे रेट्स वाढवण्याचा विचार करत आहे.
  • सुनील भारती मित्तल यांनी MWC 2023 मध्ये प्लॅनचे रेट्स वाढवण्याचा इशारा दिला आहे.
  • जानेवारीमध्ये एयरटेलनं काही सर्कल्समध्ये प्लॅन्सचे रेट वाढवले होते.

एयरटेल आपल्या प्लॅन्सच्या किंमती वाढवू शकतो. एयरटेलचे चेयरमन सुनील भारती मित्तल यांनी म्हटलं आहे की एयरटेल यंदा सर्व प्लॅनचे रेट्स वाढवण्याचा विचार करत आहे. त्यांनी ही माहिती Mobile World Congress 2023 मध्ये एका प्रश्नाचं उत्तर देताना दिली आहे. अलीकडेच कंपनीनं 19 सर्कल्समध्ये आपल्या सर्वात स्वस्त प्लॅनची किंमत वाढवण्यास सुरुवात केली आहे. अलीकडेच एयरटेलनं 99 रुपयांचा प्लॅन हटवला आणि आता बेस प्लॅनची किंमत 155 रुपये करण्यात आली आहे जी आधीपेक्षा 57 टक्के जास्त आहे.

कंपनीनं स्वतः दिली दरवाढीची माहिती

मित्तल यांनी म्हटलं आहे की कंपनीमध्ये भरपूर गुंतवणूक करण्यात आली आहे, त्यामुळे बॅलेन्स शीट मजबूत झाली आहे, परंतु टेलीकॉम इंडस्ट्रीमध्ये खर्चानुसार परतावा खूप कमी मिळतो आणि हे बदलणं आवश्यक आहे. आम्ही थोड्या प्रमाणात प्लॅन्सचे रेट्स वाढवणार आहोत, जे टॅरिफ योग्य स्थरावर आणण्यासाठी आवश्यक आहे. प्लॅन्सची किंमत किती टक्के आणि कधी वाढवली जाईल याबाबत त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही. हे देखील वाचा: 50MP चा शानदार Selfie Camera! 20GB RAM सह Vivo V27Pro 5G भारतात दाखल

कंपनी प्रति उपयोगकर्ता सरासरी महसूल (ARPU) 300 रुपयांपर्यंत वाढवू इच्छित आहे आणि टॅरिफ वाढवल्यावर टेलीकॉम कंपनीला भारतातील सर्वात मोठ्या दूरसंचार ऑपरेटर रिलायन्स जियोला आव्हान देऊ शकेल.”आम्ही किंमत थोडी वाढवण्याबद्दल बोलत आहोत, जी भारतात आवश्यक आहे. मला वाटते आहे की ती या वर्षी होईल,” असे सुनील मित्तल यांनी सांगितले. याशिवाय, कमी उत्पन्न गटावर दरवाढीचा काय परिणाम होईल, याविषयी विचारले असता, सुनील मित्तल म्हणाले की मोबाइलच्या दरांमध्ये झालेली वाढ इतर गोष्टींवरील खर्चाच्या वाढीपेक्षा खूपच कमी आहे.

19 सर्कल्समध्ये बंद झाला सर्वात स्वस्त रिचार्ज

तुम्हाला माहित असेल की एयरटेलनं यावर्षी जानेवारीमध्ये काही सर्कल्समध्ये मिनिमम मंथली रिचार्ज 57% वाढवून 155 रुपये केला आहे. म्हणजे आता 19 सर्कल्समध्ये कंपनीनं 99 रुपयांचा आपला मिनिमम रिचार्ज आता बंद केला आहे. या प्लॅनमध्ये 200 MB इंटरनेट आणि कॉलसाठी चार्ज 2.5 पैसे प्रति सेकंड चार्ज घेतला जातो. हे देखील वाचा: उन्हात रंग बदलणारा मोबाइल फोन Vivo V27 5G आला भारतात; इतकी आहे किंमत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here