5000mAh बॅटरी असलेला खूप स्वस्त स्मार्टफोन लवकरच भारतात; कमी किंमतीत 50MP कॅमेरा

लवकरच भारतात नवीन बजेट स्मार्टफोन लाँच करणार असल्याची माहिती Tecno नं कंफर्म केली आहे. टेक्नोचा नवीन स्मार्टफोन Spark 9T नावानं भारतीयांच्या भेटीला येईल. हा फोन कोणत्या दिवशी लाँच होईल याची माहिती मात्र अजून मिळाली नाही. परंतु कंपनीनं सांगितलं आहे की Spark 9T अ‍ॅमेझॉनवरून विकत घेता येईल. अ‍ॅमेझॉनवर या फोनची मायक्रोसाइट देखील लाईव्ह झाली आहे, जिथून या आगामी फोनच्या डिजाइन आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे. टेक्नोचा हा फोन ड्युअल टोन डिजाइन आणि ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह सादर करण्यात येईल.

Tecno Spark 9T येतोय भारतात

Tecno नं कंफर्म केलं आहे की Spark 9T स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच करण्यात येईल. Spark 9 सीरीजमधील हा दुसरा बजेट स्मार्टफोन असेल. या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल, ज्याचा कॅमेरा मॉड्यूल ग्लॉसी फिनिशसह येईल. कॅमेरा मॉड्यूलनंतर उर्वरित भाग मॅट फिनिश आणि वर्टिकल स्ट्रिपसह येतो.

Tecno Spark 9T चे स्पेसिफिकेशन्स

Tecno Spark 9T मध्ये 6.6-इंचाचा Full HD+ डिस्प्ले दिला जाईल. सेल्फी कॅमेऱ्यासाठी वॉटरड्रॉप स्टायल नॉच मिळेल. हा एक IPS LCD पॅनल असेल जो 60Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. Tecno चा हा फोन MediaTek Helio G35 प्रोसेसरसह येईल. फोनमध्ये 4GB रॅम आणि 3GB व्हर्च्युअल रॅम सपोर्ट मिळेल. सोबत 64GB आणि 128GB इंटरनल स्टोरेज ऑप्शन असतील.

Tecno Spark 9T स्मार्टफोनमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा दिला जाईल, सोबतीला 2MP ची डेप्थ आणि 2MP ची मायक्रो कॅमेरा लेन्स मिळेल. सेल्फी कॅमेऱ्याची माहिती मात्र मिळाली नाही. या फोनमध्ये साइड माउंट फिंगरप्रिंट स्कॅनर दिला जाईल. तसेच पावर बॅकअपसाठी 5000mAh ची बॅटरी आणि 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल. टेक्नोचा आगामी फोन ब्लू आणि ग्रीन कलर ऑप्शनमध्ये सादर केला जाईल.

काही दिवसांपूर्वी आलेल्या Tecno Spark 9 चे स्पेसिफिकेशन्स

Tecno Spark 9 स्मार्टफोनमध्ये 6.6 इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. कंपनीनं यात वॉटरड्रॉप नॉच डिजाईन दिली आहे, ज्यात सेल्फी कॅमेरा फिट करण्यात आला आहे. फोनच्या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 90Hz आहे टेक्नोच्या या फोनमध्ये 6GB रॅम आणि 5GB व्हर्च्युअल रॅम सपोर्ट देण्यात आला आहे, त्यामुळे एकूण 11GB रॅमची ताकद आवश्यकता असेल तेव्हा मिळवता येते. तसेच फोनमध्ये 128GB ची स्टोरेज मिळते. टेक्नोच्या या फोनमध्ये Mediatek Helio G37 ऑक्टा कोर प्रोसेसर मिळतो.

कॅमेरा स्पेसिफिकेशन्स पाहता Tecno Spark 9 फोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 13MP चा मुख्य सेन्सर आणि सेकंडरी AI कॅमेरा आहे. रियर पॅनलवरील कॅमेरा मॉड्यूलमध्ये LED फ्लॅश देखील मिळतो. तसेच फोनमध्ये 8MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी या नव्या टेक्नो फोनमध्ये 5000mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. टेक्नोचा हा फोन लेटेस्ट Android 12 वर चालतो.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here