Realme 10,000 रुपये आणि 15,000 रुपयांच्या बजेटमध्ये 5G फोन लाँच करणार आहे. अशी माहिती Realme India चे CEO, माधव सेठ यांनी दिली आहे. तसेच आशा आहे की Realme 10 देखील लाँच केला जाऊ शकतो. कंपनीनं आलियाकडेच भारतात एकत्र अनेक प्रोडक्ट लाँच केले आहेत, यात Realme Pad X पासून PC Monitor, Realme watch 3, रियलमी पेंसिल आणि कीबोर्डचा देखील समावेश आहे. तसेच आता कंपनी येत्या काही दिवसांमध्ये आपला फोन लाँच करण्याची योजना आखात आहे जिथे एकाचवेळी अनेक मोबाईल ग्राहकांच्या भेटीला येतील. महत्वाची बाब म्हणजे यंदा कंपनीचा स्वस्त 5G फोन मार्केटमध्ये येणार आहे.
गेल्यावर्षीच कंपनीनं 15,000 रुपयांपेक्षा कमी किंमत असलेला आपला 5G फोन Realme 8 5G लाँच केला होता परंतु 2022 मध्ये रियलमी द्वारे 10,000 रुपयांच्या बजेटमध्ये 5G फोन सादर केला जाईल. माधव सेठ यांनी ही माहिती GSMArena ला दिलेल्या मुलाखतीत दिली आहे. हा यावर्षी येत्या काही महिन्यांमध्ये सादर करण्यात येईल.

त्यांनी सांगितलं की पुढील महिन्यात रियलमी 4 नवीन प्रोडक्ट सादर करणार आहे ज्यात स्वस्त 5जी फोनचा समावेश असेल. या फोन्स किंमत 10,000 रुपये आणि 15,000 रुपयांच्या आसपास असू शकते. ते पुढे म्हणाले होते की, भारतात 5G सर्व्हिस आता लवकरच येणार आहे. त्यामुळे त्यासाठी तयारी असणं आवश्यक आहे. तसेच कंपनी यंदा कंज्यूमर ड्यूरेबल सेगमेंटमध्ये 2-3 नवीन प्रोडक्ट सादर करू शकते, असं देखील सेठ यांनी सांगितलं. यावर्षीच्या उत्तरार्धात स्मार्टफोन सेगमेंटमध्ये प्रोडक्शन वाढ होईल कारण चिप शॉर्टेजची समस्या संपत आल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
माधव सेठ यांनी आगामी किफायतशीर फोनच्या नावाची माहिती दिली नाही. परंतु आशा आहे की कंपनी लवकरच Realme 10 भारतात लाँच करू शकते. कंपनीनं गेल्यावर्षी रियलमी 9 सीरिज सादर केली होती आणि यंदा रियलमी 10 सीरीजकाढून जास्त अपेक्षा आहेत. आतापर्यंत जी माहिती आली आहे त्यानुसार कंपनी ही सीरिज दिवाळीच्या आसपास सादर करू शकते.

Realme Pad X चे स्पेसिफिकेशन्स
रियलमीचा लेटेस्ट Realme Pad X टॅबलेट 5G LTE आणि Wi-Fi Only व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या टॅबलेटमध्ये 11-इंचाचा 2K LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचं रिजोल्यूशन Full HD+ आणि रिफ्रेश रेट 60Hz आहे. प्रोसेसिंगसाठी Snapdragon 695 5G चिपसेट मिळतो. पावर बॅकअपसाठी 8,340mAh ची बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंग मिळते. फोटोग्राफीसाठी 13MP चा रियर आणि 8MP चा फ्रंट कॅमेरा आहे. टॅबलेटचे तीन व्हेरिएंट आले आहेत. या टॅबचा 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज असलेला Wi-Fi ओन्ली मॉडेल 19999 रुपये, LTE व्हेरिएंट 25999 रुपये आणि 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेला व्हेरिएंट 27999 रुपयांमध्ये सादर करण्यात आला आहे.














