Vivo T3x 5G ची कशी आहे बेंचमार्किंग साईट गीकबेंचवर स्कोर, जाणून घ्या स्पेसिफिकेशन

विवोचा T3x 5G स्मार्टफोन 17 एप्रिलला भारतीय बाजारात येण्यासाठी तयार आहे. जर तुम्ही जाणून घेण्यासाठी तयार आहात की ब्रँड लाँचच्या पूर्वीच बेंचमार्किंग प्लॅटफॉर्म गीकबेंचवर स्मार्टफोनने कसा स्कोर केला आहे तो याची माहिती समोर आली आहे. तसेच, आतापर्यंत Vivo T3x 5G चे काही स्पेसिफिकेशन कंफर्म पण झाले आहेत, तसेच हा फोन लीकमध्ये पण दिसला आहे. चला, संपूर्ण गोष्ट सविस्तर जाणून घेऊया.

Vivo T3x 5G गीकबेंच लिस्टिंगची माहिती

  • आगामी स्मार्टफोन Vivo T3x 5G ला गीकबेंच वेबसाईटवर मॉडेल नंबर V2338 सह स्पॉट करण्यात आले आहे.
  • Vivo T3x 5G स्मार्टफोनने सिंगल-कोर टेस्टमध्ये 946 अंक आणि मल्टी-कोर टेस्टमध्ये 2839 अंक प्राप्त केले आहेत.
  • लिस्टिंगमध्ये दिसत आहे की नवीन विवो डिव्हाईस ऑक्टा-कोर चिपसेट असणार आहे. ज्याची हाई क्लॉक स्पीड 2.21GHz सांगण्यात आली आहे. त्याचबरोबर ग्राफिक्ससाठी एड्रेनो 710 GPU ची उपस्थितीची माहिती मिळाली आहे.
  • प्रोसेसरच्या माहितीनुसार Vivo T3x 5G Qualcomm Snapdragon 6 Gen 1 चिप असले. ही गोष्ट ब्रँडने पण कंफर्म केली आहे.
  • गीकबेंच डेटाबेसमध्ये समोर आले आहे की स्टोरेजच्या बाबतीत फोन 8GB पर्यंत रॅम कोला सपोर्ट करेल.
  • ऑपरेटिंग सिस्टम पाहता Vivo T3x 5G गीकबेंचवर अँड्रॉईड 14 असल्याचे सांगण्यात आले आहे.

Vivo T3x 5G ची माहिती (कंफर्म)

  • फ्लिपकार्ट मायक्रो-साईट नुसार Vivo T3x 5G मोबाईल क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 6 जेन 1 चिपसेटसह असणार आहे. या चिपसह फोनने AnTuTu V10 बेंचमार्किंग प्लॅटफॉर्मवर 560K पेक्षा जास्त अंक मिळवले आहेत.
  • हा डिव्हाईस सेलेस्टियल ग्रीन आणि क्रिमसन ब्लिस सारख्या दोन कलरमध्ये लाँच होईल.
  • डिझाईनच्या बाबतीत जो फोटो फिल्पकार्टवर दिसून आला आहे, याच्या मागील बाजूस एक गोलाकार कॅमेरा मॉड्यूल आहे. ज्यात दोन कॅमेरा लेन्स आणि LED फ्लॅश आहे.
  • Vivo T3x 5G मोबाईल भारतात 15 हजार रुपयांपेक्षा कमीमध्ये सादर होणार असल्याची माहिती ऑनलाईन सेलिंग साईट फ्लिपकार्टवर पाहायला मिळाली आहे.

Vivo T3x 5G स्पेसिफिकेशन (संपूर्ण माहिती लीक)

  • डिस्प्ले: Vivo T3x 5G मध्ये 6.72-इंचाचा FHD+ डिस्प्ले मिळू शकतो. यावर 120Hz रिफ्रेश रेट आणि पंच-होल कटआऊट डिझाईन दिली जाऊ शकते.
  • स्टोरेज: हा फोन तीन मेमरी व्हेरिएंटमध्ये सादर होऊ शकतो. ज्यात 4GB रॅम + 128GB स्टोरेज, 6GB रॅम + 128GB स्टोरेज आणि 8GB रॅम + 128GB स्टोरेज येऊ शकतात.
  • कॅमेरा: Vivo T3x 5G मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप LED फ्लॅशसह दिसून आला आहे. ज्यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 2MP चा सेकंडरी सेन्सर लावला जाऊ शकतो. तसेच, सेल्फीसाठी 8MP ची लेन्स मिळण्याची शक्यता आहे.
  • बॅटरी: Vivo T3x 5G फोनमध्ये 44W फास्ट चार्जिंगला सपोर्टसह 6,000mAh ची बॅटरी असणार असल्याची माहिती समोर आली आहे.
  • इतर: फोनमध्ये साईड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, ड्युअल स्टीरियो स्पिकर, पाणी आणि धूळीपासून वाचण्यासाठी IP64 रेटिंग सारखे अनेक फिचर्स दिले जाऊ शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here