4जीबी रॅम व 4,000एमएएच बॅटरी सह लॉन्च झाला ‘एक्स पेन’ असलेला नोट 5 स्टायलस

स्मार्टफोन ब्रँड इनफिनिक्स ने ऑगस्ट महिन्यात भारतात 4,500एमएएच बॅटरी असलेला स्मार्टफोन इनफिनिक्स नोट 5 लॉन्च केला होता. जो मोठया बॅटरी आणि डिजाईन व लुक मुळे लोकांना आवडला होता. आता कंपनी ने आपल्या या स्मार्टफोनचा अजून एक एडवांस वर्जन इंडियन मार्केट मध्ये सादर केला आहे. इनफिनिक्स ने आज भारतात नवीन स्मार्टफोन नोट 5 स्टायलस नावाने लॉन्च केला आहे जो 15,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

इनफिनिक्स नोट 5 स्टायलस सॅमसंगच्या ​नोट डिवाईस प्रमाणे स्मार्ट पेन सोबत येतो ज्याला कंपनी ने ‘एक्स पेन’ चे नाव दिले आहे. हा पेन फोन आॅपरेट करण्या सोबतच करने फोन मध्ये पेटिंग व डिजाईनिंग तसेच प्रेजेंटेशन पण बनवू शकतो. इनफिनिक्स नोट 5 स्टायलस चे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन फुल मेटल बॉडी वर बनला आहे. हा 2,160 x 1,080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 5.93-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे जो 2.5डी कर्व्ड ग्लास ने प्रोटेक्टेड आहे.

इनफिनिक्स नोट 5 स्टायलस एंडरॅयड ओरियो आधारित एंडरॉयड वन आॅपरेटिंग सिस्टम वर सादर करण्यात आला आहे जो 2.0गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर सह मीडियाटेक हेलीयो पी23 चिपसेट वर चालतो. कंपनी ने हा फोन 4जीबी रॅम सह सादर करण्यात आला आहे. या फोन मध्ये 64जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली जी माइक्रोएसडी कार्ड ने वाढवता येते. तसेच ग्राफिक्स साठी नोट 5 स्टायलस माली जी71 जीपीयू ला सपोर्ट करतो.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता इनफिनिक्स नोट 5 स्टायलस च्या बॅक तसेच फ्रंट दोन्ही पॅनल्स वर 16-मेगापिक्सलचा रियर तसेच सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. रियर कॅमेरा सेंसर डुअल एलईडी फ्लॅश सह एफ/1.8 अपर्चरला सपोर्ट करतो तर सेल्फी कॅमेरा एफ/2.0 अपर्चर सह येतो. इनफिनिक्स नोट 5 स्टायलस डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलईटी ला सपोर्ट करतो.

इनफिनिक्स नोट 5 स्टायलस मध्ये सिक्योरिटी साठी बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. तर पावर बॅकअप साठी हा फोन फास्ट चार्जिंंग सपोर्ट वाल्या 4,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. इनफिनिक्स नोट 5 स्टायलस 15,999 रुपयांमध्ये येत्या 4 डिसेंबर पासून शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर एक्सक्लूसिव विकत घेता येईल. रिलायंस जिओ आपल्या कस्टमर्सना या फोन सोबत 2200 रुपयांचा कॅशबॅक व 50जीबी एक्स्ट्रा डेटा पण देत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here