रोज 2GB डेटा देणारे Jio चे स्वस्त आणि बेस्ट प्लॅन्स; किंमत 249 रुपयांपासून सुरु

5जी स्पेक्ट्रम (5G Spectrum) च्या लिलावाची सांगता सात दिवसांनंतर झाली आहे. त्यामुळे आता भारतात 5जी सर्व्हिसचा मार्ग मोकळा झाला आहे. या लिलावात Jio नं सर्व टेलिकॉम कंपन्यांना मागे टाकत देशातील सर्व 22 टेलीकॉम सर्कल्समध्ये प्रीमियम 700 मेगाहर्ट्ज बँडमध्ये 5जी स्पेक्ट्रम विकत घेतला आहे. त्यामुळे लवकरच जियो ग्राहकांना 5G नेटवर्कची चव चाखायला मिळू शकते. परंतु तरीही 4G काही लवकर देशातून गायब होणार नाही. त्यामुळे जर तुम्ही Jio चा 2GB डेली डेटा देणारा प्लॅन शोधत असाल तर पुढे आम्ही कंपनीचेय बेस्ट प्लॅन्सची माहिती दिली आहे, जे रोज 2GB डेटा देतात. कंपनीकडे 1GB डेली डेटा, 1.5GB डेली डेटा आणि 3GB डेली डेटा देणारे प्लॅन्स देखील आहेत परंतु जर तुम्ही गरज 2GB ची असेल तर या लेखात तुम्हाला best Jio 2GB data per day plans ची माहिती मिळेल.

Top Jio 2GB data per day plans

  • Jio Rs 249 plan
  • Jio Rs 299 plan
  • Jio Rs 533 plan
  • Jio Rs 719 plan
  • Jio Rs 799 plan

Jio चा 249 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

हा जियोचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन आहे ज्यात 2GB डेटा रोज मिळतो, कंपनीनं या प्रीपेड प्लॅनची किंमत 249 रुपये ठेवली आहे. किंमत कमी असल्यामुळे या प्लॅनमध्ये वैधता मात्र जास्त मिळत नाही. या प्लॅनमध्ये एकूण 23 दिवसांची वैधता मिळते, अर्थात एक महिना देखील हा प्लॅन वापरता येत नाही. तसेच या रिचार्जमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉइस कॉल, 100 SMS डेली आणि JioCinema, JioTV सारख्या अ‍ॅप्सचे सब्सक्रिप्शन मिळते.

Jio चा 299 रुपयांच्या रिचार्ज प्लॅन

हा प्लॅन महिनाभराची वैधता हवी हसणाऱ्या युजर्ससाठी योग्य आहे. प्रति दिन 2GB डेटासह या Jio प्रीपेड प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता मिळते. तसेच रिचार्जमध्ये डेली 100 एसएमएस, कोणत्याची नेटवर्कवर अनलिमिटेड कॉल, आणि JioCinema, JioTV आणि अन्य अ‍ॅप्सचा मोफत लाभ घेता येतो.

Jio चा 533 रुपयांच्या रिचार्ज प्लॅन

Jio च्या 533 रुपयांच्या पॅकमध्ये रोज 2GB डेटा मिळतो. तसेच यात 56 दिवसांची वैधता देण्यात आली आहे, त्यामुळे तुम्हाला एकूण 112GB डेटा जवळपास दोन महिन्यांच्या कालावधीत वापरता येतो. तसेच या प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉइस कॉल, रोज मोफत 100 एसएमएस आणि JioCinema, JioTV, Jio Cloud आणि सारख्या अ‍ॅप्सचे सब्सस्क्रिप्शन मिळते.

Jio चा 719 रुपयांच्या रिचार्ज प्लॅन

Jio च्या 719 रुपयांच्या प्लॅनमध्ये प्रतिदिन 2GB डेटा मिळतो आणि याची वैधता 84 दिवसांची आहे. या हिशोबाने या प्लॅनमध्ये एकूण 168GB डेटा मिळतो. तसेच रिचार्जमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटडे कॉल, संपूर्ण वैधतेसाठी रोज 100 एसएमएस आणि JioTV, JioCinema, JioCloud आणि अन्य अ‍ॅप्सचे मोफत लाभ दिला जातो.

Jio चा 799 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

Jio च्या 799 रुपयांच्या पॅकमध्ये देखील ग्राहकांना रोज 2GB डेटा मिळतो. परंतु, प्लॅनमध्ये फक्त 56 दिवसांची वैधता मिळते. या पॅकची खासियत म्हणजे या सोबत मिळणारं Disney+ Hotstar चं सब्सक्रिप्शन. तसेच या प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉइस कॉल आणि रोज 100 एसएमएस दिले जातात. जियो अ‍ॅप्सचा फायदा देखील या पॅकमध्ये मिळतो.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here