एक्सक्लूसिव : 48-एमपी ट्रिपल रियर आणि 32-एमपी पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्यासह लॉन्च होईल वीवो वी15 प्रो

वीवो वी15 प्रो च्या बातम्या जेव्हापासून यायला लागल्या आहेत तेव्हापासून 91मोबाईल्स ने या स्मार्टफोन संबंधित अनेक एक्सक्लूसिव बातम्या आपल्या वाचकांपर्यंत पोचवल्या आहेत. कंपनी द्वारा घोषणा करण्याआधीच आम्ही सांगितले होते कि वीवो फेब्रुवारी मध्ये भारतात आपली वी स्मार्टफोन सीरीज वाढवत नवा स्मार्टफोन आणेल जो वी15 प्रो नावासह लॉन्च केला जाईल. काळाचा आम्ही सांगितले होते कि येत्या 15 फेब्रुवारी पासून वी15 प्रो प्री-बुकिंग साठी उपलब्ध होणार आहे जो 20 फेब्रुवारीला भारतात लॉन्च होईल. तर आज​ लॉन्चच्या आधीच आम्ही या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स पण आणले आहेत.

वीवो वी15 प्रो ची सर्वात मोठी खासियत फोनचा कॅमेरा सेग्मेंट असेल. फोनच्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल तसेच हा फोन पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. वीवो 15 प्रो मध्ये 32-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला जाईल जो फोन बॉडी मध्ये असेल. सेल्फीची कमांड देताच हा सेंसर पॉप अप कॅमेऱ्याच्या स्वरूपात बाहेर येईल. तसेच फोनच्या बॅक पॅनल वरील ट्रिपल कॅमेरा सेटअप मध्ये 48-मेगापिक्सल (12 X 4) चा प्राइमरी कॅमेरा सेंसर, 8-मेगापिक्सलचा सेकेंडरी तसेच 5-मेगापिक्सलचा तिसरा कॅमेरा सेंसर असेल.

वी15 प्रो मध्ये फुल व्यू डिस्प्ले देण्यात येईल जो सुपर एमोलेड असेल. या डिस्प्लेच्या खालच्या भागात अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर दिला जाईल. वी15 प्रो 6जीबी रॅम सह बाजारात येईल तसेच फोन मध्ये 128जीबी ची इंटरनल स्टोरेज दिली जाईल. वीवो आपला हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट सह लॉन्च करेल. वीवो येत्या 20 फेब्रुवारीला वी15 प्रो भारतात सादर करणार आहे. या स्मार्टफोनच्या किंमतीची माहिती लवकरच तुम्हाला दिली जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here