गेले कित्येक दिवस चर्चेत राहिल्यानंतर OnePlus चा नवीन स्मार्टफोन OnePlus 10T भारतीय बाजारासह जागतिक बाजारात सादर करण्यात आला आहे. न्यूयॉर्क मध्ये आयोजित एका लाँच इव्हेंटच्या माध्यमातून T-सीरीजमध्ये हा नवीन आणि दमदार फोन लाँच करण्यात आला आहे. OnePlus 10T मध्ये Qualcomm Snapdragon 8+ Gen1 चिपसेट, 150W फास्ट चार्जिंग सपोर्ट, नाईटस्केप 2.0, 120Hz Fluid अॅमोलेड डिस्प्ले, HyperBoot Gaming Engine 3.0, आणि 3.D कूलिंग सिस्टम असे दमदार फीचर्स देण्यात आले आहेत.
OnePlus 10T ची डिजाइन आणि बॉक्स कंटेंट
OnePlus 10T मध्ये कंपनीनं 360-degree antenna design चा वापर केला आहे. फोनच्या फ्रटला पंच-होल कटआउट आहे. तसेच तिन्ही कडा बेजल लेस आहेत, तर बॉटमला बारीक चिन पार्ट आहे. मागच्या बाजूस Hasselblad ब्रँडिंगसह ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. फोनच्या बॉटमला टाईप सी पोर्ट व स्पिकर ग्रिल आहे. सुरक्षेसाठी OnePlus 10T मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर आणि फेस अनलॉक फीचर मिळतं.
OnePlus 10T च्या बॉक्समध्ये या फोनसह 160W SUPERVOOC Power Adapter आणि Type-C Cable मिळेल. तसेच एक क्विक स्टार्ट गाईड, वेलकम लेटर, सेफ्टी इनफोर्मेशन व वॉरंटी कार्ड, स्क्रीन प्रोटेक्टर (pre-applied), प्रोटेक्टिव्ह केस आणि सिम ट्रे इजेक्टर देखील मिळतो.
OnePlus 10T चे स्पेसिफिकेशन्स व फीचर्स
डिस्प्ले: OnePlus 10T मध्ये कंपनीनं 6.7-इंचाचा FHD+ डिस्प्ले दिला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट, 950 nits पीक ब्राईटनेस, 2412×1080 पिक्सल रिजोल्यूशन आणि 20.1:9 अस्पेक्ट रेशियोला सपोर्ट करतो. HDR10+ सर्टिफाईड डिस्प्लेला कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ची सुरक्षा देण्यात आली आहे.
प्रोसेसिंग पावर: OnePlus 10T मध्ये लेटेस्ट Snapdragon 8+ Gen 1 चिपसेट देण्यात आला आहे. जो Snapdragon 8 Gen 1 चिपसेट पेक्षा जास्त वेगवान आणि कार्यक्षम आहे. सोबतीला या फ्लॅगशिप वनप्लसमध्ये 16GB पर्यंतचा LPDDR5 RAM आणि 256GB पर्यंतची UFS 3.1 two-lane storage2 देण्यात आली आहे.
कॅमेरा: OnePlus 10T च्या बॅक पॅनलवर ड्युअल एलईडी फ्लॅशसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात f/1.8 अपर्चर आणि OIS सपोर्ट असलेला 50MP Sony IMX766 सेन्सर प्रायमरी कॅमेऱ्याचे काम करतो. तर f/2.2 अपर्चर असलेला 8MP चा अल्ट्रा-वाईड कॅमेरा आणि 2MP चा मॅक्रो सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी यात f/2.2 अपर्चरसह 16MP चा फ्रंट-फेसिंग कॅमेरा मिळतो.
बॅटरी: 150W SUPERVOOC फास्ट चार्जिंग सपोर्टसह फोनमध्ये 4,800mAh ची बॅटरी मिळते. फोनच्या बॉक्समध्ये एक 160W चा चार्जर मिळेल, जो OnePlus नुसार OnePlus 10T स्मार्टफोनला 19 मिनिटांत पूर्णपणे चार्ज करेल.
ऑपरेटिंग सिस्टम आणि कनेक्टिव्हिटी फीचर: कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये वाय-फाय 6, ब्लूटूथ 5.2 आणि 5जी सेल्युलर नेटवर्क मिळतं. ड्युअल-स्टीरियोसह येणारा हा फोन Android 12 आधारित OxygenOS 12.1 वर चालतो OnePlus 10T ला कंपनी तीन प्रमुख OS अपडेट आणि चार वर्षांचे सिक्योरिटी अपडेट देणार आहे.
OnePlus 10T ची किंमत आणि लाँच ऑफर्स
भारतात OnePlus 10T ची किंमत 49,999 रुपयांपासून सुरु होते. हा फोन 6 ऑगस्टपासून Amazon आणि OnePlus च्या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून विकत घेता येईल. फोनचे मूनस्टोन ब्लॅक आणि झेड ग्रीन कलर व्हेरिएंट आले आहेत. डिवाइसच्या 8GB/128GB व्हेरिएटची किंमत 49,999 रुपये, 12GB/256GB ची किंमत 54,999 रुपये आणि 16GB/256GB ची किंमत 59,999 रुपये आहे. OnePlus 10T को ICICI आणि SBI च्या कार्डनं विकत घेतल्यास युजर्सना 5,000 रुपयांचा इंस्टंट डिस्काउंट मिळेल.


















