Vodafone Idea युजर्सना जोरदार झटका, कंपनीनं गुपचूप बंद केले ‘हे’ प्लॅन्स

Vodafone Idea RedX Plans Discontinue: देशातील लोकप्रिय प्रायव्हेट टेलीकॉम कंपन्यांपैकी एक वोडाफोन आयडिया (Vodafone Idea) च्या ग्राहकांना एक जोरदार झटका लागला आहे. कंपनीनं कोणालाही न सांगता खूप लोकप्रिय प्लॅन्स काढून टाकले आहेत. कंपनीनं RedX postpaid plans बंद केले आहेत. म्हणजे जर तुम्ही विआयचे पोस्टपेड ग्राहक असाल तर तुम्ही नाराज होऊ शकता. कंपनीनं Vodafone Idea RedX Plans अचानक बंद करण्यामागे कोणतंही कारण सांगितलं नाही. चला जाणून घेउया की कोणते प्लॅन्स कंपनीनं बंद केले आणि यात तुम्हाला कोणते फायदे मिळत होते.

Vi नं दिला युजर्सना झटका

TelecomTalk नं सर्वप्रथम ही माहिती जगासमोर ठेवली आहे की वोडाफोन आयडिया (Vodafone Idea) नं गुपचूप आपले लोकप्रिय पोस्टपेड प्लॅन्स (Vodafone Idea RedX Plans) बंद केले आहेत. पुढे आम्ही या बंद केलेल्या प्लॅन्सची सविस्तर माहिती दिली आहे. हे देखील वाचा: Jio 5G Plans: जियोचा 5G वापरण्यासाठी कोणता प्लॅन आहे बेस्ट, पाहा यादी

Vi चे हे Plans झाले बंद

Vodafone Idea RedX Plans च्या यादीतील 1,099 रुपये, 1,699 रुपये आणि 2,299 रुपयांचा प्लॅन कंपनीच्या साइटवरून काढून टाकण्यात आले आहेत. विशेष म्हणजे हे प्लॅन्स घेण्यासाठी तुम्हाला सहा महिन्यांचा लॉक-इन पीरियड देखील फॉलो करावा लागतो. ज्यात तुम्ही एकदा निवडलेला प्लॅन सहा महिन्यांपर्यंत बदलू शकत नाही.

Vi RedX Rs 1,099 plan: या पोस्टपेड प्लॅनमध्ये 100 एसएमएससह अनलिमिटेड डेटा मिळतो. तसेच युजर्सना प्लॅनमध्ये Amazon Prime, Disney+ Hotstar, Vi Movies and TV आणि Netflix सब्सक्रिप्शन देखील दिलं जात आहे. इतकेच नव्हे तर सब्सक्राइबर्सना वर्षात चार वेळा विनाशुल्क इंटरनॅशल आणि डोमेस्टिक एयरपोर्टच्या लाउंजचा अ‍ॅक्सेस दिला जातो.

Vi RedX Rs 1,699 plan: या प्लॅन बद्दल बोलायचं झालं तर हा देखील अनलिमिटेड डेटा, अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि नॅशनल रोमिंग कॉलसह डेली 100 एसएमएस किंवा 3000 एसएमएस प्रति माह देतो. तसेच प्लॅनमध्ये अ‍ॅमेझॉन प्राइम, नेटफ्लिक्स, डिज्नी + हॉटस्टार आणि विआय मुव्हीज आणि टीव्हीसाठी तीन कनेक्शन आणि वर्षांचे सदस्यत्व मिळते. तसेच सब्सक्राइबर्सना वर्षात कमीत कमी चार वेळा इंटरनॅशल आणि डोमेस्टिक एयरपोर्टच्या लाउंजचा अ‍ॅक्सेस मिळतो.

Vi RedX Rs 2,299 plan: या प्लॅनमध्ये 1,699 रुपयांचा प्लॅन प्रमाणेच सर्व बेनिफिट्स मिळतात. फरक फक्त इतकाच आहे की हा प्लॅन तीन ऐवजी एकूण पाच कनेक्शन प्रोवाइड करतो. हे देखील वाचा: 12 महीने चालणारा BSNL चा रिचार्ज, भरपूर डेटा आणि फ्री कॉलिंग

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here