शाओमी भारतीय मोबाइल बाजारातील सर्वात मोठे नाव झाले आहे. देशात शाओमी चे फॅन्स लाखोंच्या संख्येने आहेत. शाओमी ला भारतात येऊन 4 वर्ष झाले आहेत आणि यावर्षी कंपनी आपला चौथा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने शाओमी कडून मी एनिवर्सरी सेल ची सुरवात करणार आहे जो उद्या म्हणजे 10 जुलै ला सुरू होऊन 12 जुलै पर्यंत चालू असेल.
शाओमी मी एनिवर्सरी सेल मध्ये कंपनी चे स्मार्टफोन्स, स्मार्ट टीवी, मी एक्सेसरीज, मी बँड 2 सारखे प्रोडक्ट्स आकर्षक ऑफर्स आणि चांगल्या डील्स सह सेल साठी उपलब्ध होतील. या सेल मध्ये शाओमी कंपनी चे काही डिवाइस साठी 4 रुपयांचा फ्लॅश सेल ठेवणार आहे. या फ्लॅश सेल मध्ये रेडमी नोट 5 प्रो, रेडमी वाय2, मी एलईडी स्मार्ट टीवी 4 55 इंच, मी बॉडी कंपोझिशन स्केल, रेडमी वाय2 आणि मी बँड 2 विकत घेता येतील. 4 रुपये वाला हा फ्लॅश सेल तिन दिवस संध्याकाळी 4 वाजता आयोजित होईल.
या सेल मध्ये संध्याकाळी 6 वाजता कॉम्बो ऑफर दिली जाईल. या आॅफर मध्ये मी बॉडी कंपोझिशन स्केल आणि मी बँड 2 3798 रुपयांच्या ऐवजी फक्त 1,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. त्याचप्रमाणे रेडमी नोट 5 आणि मी वीआर प्ले 2 कॉम्बो 9,999 रुपये, रेडमी वाई1 आणि मी ब्लूटूथ हेडसेट 8,999 रुपये तसेच मी एयर प्यूरिफायर 2 आणि फिल्टर 11,498 रुपयांच्या ऐवजी फक्त 8,999 रुपयांमध्ये विकत घेण्याची संधी मिळेल.
शाओमी मी ऐनिवर्सरी सेल मध्ये एक्सचेंज ऑफर पण आहे ज्यात जुन्या स्मार्टफोन च्या बदल्यात नवीन स्मार्टफोन विकत घेता येईल. तसेच 469 रुपयांच्या सुरवाती किंमतीत कंपनी मी प्रोटेक्ट ऑफर पण देत आहे. या सेल मध्ये 29 रुपयांमध्ये मोबाईल कवर सेल साठी असतील. विशेष म्हणजे शाओमी मी ऐनिवर्सरी सेल मध्ये एसबीआई क्रेडिट कार्ड धारकांना 500 रुपयांचा इंस्टेंट डिस्काउंट मिळेल. सेल मध्ये पेटीएम वरून खरेदी केल्यास 500 रुपयांचा कॅशबॅक तर मोबिक्विक वरून पे केल्यास अधिकतम 3,000 रूपयांची सुपरकॅश मिळेल.
शाओमी मी ऐनिवर्सरी सेल सोबत जोडले जाण्यासाठी इथे क्लिक करा














