सप्टेंबरमध्ये मोठ्या पडद्यावर रिलीज झालेलीच Chup चित्रपट आता OTT रिलीज होणार आहे. Dulquer Salmaan आणि Sunny Deol यांचा सायकोलॉजिकल रिव्हेंज थ्रिलर चित्रपट ‘Chup: Revenge of the Artist’ थिएटरमध्ये असताना देखील चर्चेत होता. चित्रपटाने जास्त गल्ला जरी गोळा केला नसला तरी दर्शकांनी सोशल मीडियावर याची खूप प्रशंसा केली होती. जर तुम्हाला देखील थ्रिलर मुव्हीज बघायची आवड असेल तर आणि दुल्कर सलमान व सनी देओलचे फॅन असाल तर हा चित्रपट पाहू शकता. यात सनी देओल पोलिसाच्या भूमिकेत आहे जो एका सीरियल किलरचा शोध घेत आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक R Balki यांनी या चित्रपटांचे दिग्दर्शन केलं आहे.
Chup Movie on ZEE5
23 सप्टेंबरला मोठ्या पदड्यावर रिलीज झालेला हा चित्रपट ZEE5 प्लॅटफॉर्मवर रिलीज केला जात आहे. Zee5 प्लॅटफॉर्मनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रिलीज डेटची माहिती दिली आहे. पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे की हा चित्रपट 25 नोव्हेंबरला OTT प्लॅटफॉर्मवर येईल. जर तुम्ही देखील दुल्कर सलमानची परफॉर्मन्स मोठ्या पडद्यावर मिस केली असेल तर Zee5 वर हा चित्रपट 25 नोव्हेंबरला रिलीज केला जात आहे. सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिण्यात आलं आहे की, “सर्व क्रिटिक सावधान, येत आहे क्रिटिक्सचा क्रिटिक…” हा चित्रपट हिंदी, तामिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये रिलीज केला जाईल.
चुप चित्रपट ओटीटी रिलीज डेट समोर आल्यानंतर सनी देओल सह Dulquer Salmaan चे फॅन्स खूप उत्सुक झाले आहेत. बऱ्याच काळानंतर सनी देओल आणि सलमानचा एखादा चित्रपट आला आहे. त्यामुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दोन्ही अॅक्टर्सच्या चाहत्यांनी या चित्रपटाला डोक्यावर उचलून धरलं आहे. हे देखील वाचा: Govinda Naam Mera: कसलेल्या मराठी कलाकारांसह येतोय भन्नाट कॉमेडी चित्रपट; थेट OTT वर होणार रिलीज
All set to nab the #CriticsKaCritic in just 3 days!
Watch #ChupOnZEE5. #Chup #ChupRevengeOfTheArtist@iamsunnydeol @dulQuer @shreyadhan13 @saranyaponvanan #RBalki @vishalsinha_dop@HopeProdn @ItsAmitTrivedi @SneKhanwalkar @AmanPant02 @swanandkirkire @ZEE5Global pic.twitter.com/I5Lrh4Rjyv— Pooja Bhatt (@PoojaB1972) November 22, 2022
‘चुप’ चित्रपटात Shreya Dhanwanthary नं देखील महत्वाची भूमिका साकारली आहे. जिने याआधी Scam 1992 मध्ये शानदार कामं केले होतं. तसेच या सिनेमात आलीय भट्टची मोठी बहिणी पूजा भट्ट देखील प्रमुख भूमिका करत आहे. बॉलीवुडचे दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन या चित्रपटात एका म्यूजिक कंपोजरच्या भूमिकेत दिसतील. चित्रपटाची गोष्ट पाहता यात सनी देओल सीरियल किलरचा शोध घेत आहे जो नेहमी चित्रपट समीक्षकांना टारगेट करतो. संपूर्ण गोष्टीसाठी तुम्हाला 25 नोव्हेंबरची वाट पाहावी लागेल आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर या चित्रपटाचा आनंद घेता येईल.
लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.















