हुआवई च्या आगामी स्मार्टफोन नोवा 3 बद्दल मागच्याच आठवड्यात माहिती मिळाली होती की कंपनी आपला हा फोन 18 जुलै ला लॉन्च करेल. आज हुआवई ने नोवा 3 स्मार्टफोन च्या लॉन्च ची तारीख आॅफिशियल केली आहे. हुआवई ने नोवा 3 च्या लॉन्च साठी मीडिया इन्वाईट पाठवणे सुरू केले आहे आणि स्पष्ट केले आहे की हा स्मार्टफोन 18 जुलै ला अंर्तराष्ट्रीय मंचावरून लॉन्च केला जाईल.
हुआवई ने चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो च्या माध्यमातून फोन चे आॅफिशियल लॉन्च पोस्टर शेयर केले आहेत. कंपनी ने मीडिया इन्वाईट मधून सांगितले आहे की कंपनी 18 जुलै ला शेनझेंन स्टेडियम मध्ये ईवेंट चे आयोजन करून हा फोन पहिल्यांदाच टेक विश्वा समोर सादर करेल. 18 जुलै ला हा फोन चीनी बाजारात येईल तर 28 जुलै हा फिलिपिंस मध्ये लॉन्च केला जाईल.

हुआवई नोवा 3 ची सर्वात मोठी खासियत फोन मधील 4 कॅमेरा सेंसर असतील. मिळालेल्या माहितीनुसार फोन च्या बॅक तसेच फ्रंट दोन्ही पॅनल्स वर 2-2 कॅमेरा सेंसर दिले जातील. फोन च्या बॅक पॅनल वर 16-मेगापिक्सल आणि 24-मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो तर सेल्फी साठी यात 24-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा सेंसर मिळू शकतो.
लीक्स नुसार या फोन मध्ये 6.3-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले दिला जाऊ शकतो. हा फोन एंडरॉयड ओरियो आधारित असेल तसेच 2.36गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर वर चालेल. लीक नुसार या फोन मध्ये 6जीबी रॅम आणि 64जीबी व 128जीबी चे दोन स्टोरेज आॅप्शन दिले जाऊ शकतात.
बोलले जात आहे की हा फोन ग्लास पॅनल सह सादर केला जाऊ शकतो तसेच यात रियर फिंगरप्रिंट सेंसर दिला जाऊ शकतो. तसेच पावर बॅकअप साठी फोन मध्ये 3,650एमएएच ची बॅटरी दिली जाऊ शकते. हुआवई नोवा 3 ला कंपनी ब्लॅक आणि ब्लू कलर वेरिएंट मध्ये सादर करू शकते. चीनी बाजारात या फोनची किंमत काय असेल तसेच फोनच्या ठोस स्पेसिफिकेशन्स साठी 18 जुलै ची वाट बघावी लागेल.














