3 जीबी रॅम असलेले बेस्ट स्मार्टफोन्स, सर्वांची किंमत 9,000 पेक्षा पण कमी

भारतीय स्मार्टफोन बाजारात लो बजेट सेग्मेंट मध्ये लॉन्च होणाऱ्या स्मार्टफोन्सना कायम मागणी असते. 6,000 ते 9,000 रुपयांचा प्राइज ब्रॅकेट असा आहे ज्यात स्मार्टफोन सर्वात जास्त विकले जातात. भारतीय यूजर्सना कमी किंमतीत चांगले स्पेसिफिकेशन्स असलेले मोबाईल जास्त आवडतात आणि याचा फायदा स्मार्टफोन्स ब्रँड्स घेत आहेत. Xiaomi, Realme सारख्या कंपन्यांसोबतच Samsung, Infinix व Tecno सारखे ब्रँड्स पण या सेग्मेंट मध्ये आपले प्रोडक्ट्स सादर करत आहेत. या बजेट मध्ये 3 GB RAM आदर्श मानला जातो जो प्रोसेसिंग स्मूद ठेवतो. पुढे आम्ही भारतीय बाजरातील अश्या नवीन स्मार्टफोन्सचा उल्लेख केला आहे जे 3 जीबी रॅम सह येतात आणि सर्वांची किंमत 9,000 रुपयांच्या आत आहे.

Samsung Galaxy M01

या सेग्मेंट मधील बेस्ट स्मार्टफोन्स पैकी एक आहे सॅमसंगचा गॅलेक्सी एम01. हा फोन 3 जीबी रॅम सह लॉन्च झाला आहे जो 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी माइक्रोएसडी कार्डने 512 जीबी पर्यंत वाढवता येते. हा सॅमसंग फोन ब्लॅक, ब्लू आणि रेड कलर मध्ये फक्त 8,399 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Samsung Galaxy M01 मध्ये 19:9 आस्पेक्ट रेशियो असलेला 5.7 इंचाचा एचडी+ इनफिनिटी-वी डिस्प्ले देण्यात आली आहे. अँड्रॉइड 10 सह हा फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 439 चिपसेट वर चालतो. फोटोग्राफीसाठी बॅक पॅनल वर 13 मेगापिक्सलचा प्राइमरी व 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर देण्यात आला आहे तसेच सेल्फीसाठी फोन 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्यालाला सपोर्ट करतो. डुअल सिम, 4जी वोएलटीई, डॉल्बी एटमॉस व फेस अनलॉक फीचर सोबतच 4,000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.

Xiaomi Redmi 9i

शाओमी द्वारे कालच लॉन्च केला गेलेला हा फोन भारतीय बाजारात दोन वेरिएंट्स मध्ये आला आहे. फोनचा 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 8,299 रुपये तर 4 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 9,299 रुपयांमध्ये 18 सप्टेंबर पासून विक्रीसाठी उपलब्ध होईल. हा फोन 3 जीबी रॅम सह आला नाही पण या किंमतीत हा सर्वात नवीन आणि बेस्ट फोन आहे असे म्हणता येईल. हा फोन 20:9 आस्पेट रेशियो सह 6.53 इंचाच्या एचडी+ एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करतो.

शाओमीने फोनचा डिस्प्ले पी2आई टेक्नॉलॉजी सह दिला आहे जो वापर करताना डोळ्यांचे संरक्षण करतो. Redmi मध्ये अँड्रॉइड 10 आधारित मीयूआई देण्यात आला आहे त्याचबरोबर हा फोन मीडियाटेक हीलियो जी25 चिपसेट वर चालतो. फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर 13 मेगापिक्सलचा सेंसर देण्यात आला आहे, सोबतच रेडमी 9आई मध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. 3.5एमएम जॅक, डुअल सिम आणि 4जी वोएलटीई सोबतच फोन फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करतो. फोन मध्ये 10वॉट चार्जिंग असलेली 5,000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.

Tecno Spark Power 2 Air

परवा भारतीय बाजारात लॉन्च झालेला हा टेक्नो फोन 6,000एमएएच च्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो. हा फोन 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वर लॉन्च झाला आहे जो येत्या काही दिवसांत शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर 8,499 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल. टेक्नोचा हा फोन 20.5:9 आस्पेक्ट रेशियो वर लॉन्च झाला आहे जो 7 इंचाच्या एचडी+ आईपीएस एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करतो. अँड्रॉइड 10 आधारित हाईओएस 6.1 सह हा फोन मीडियाटेक हीलियो ए22 चिपसेट वर चालतो.

फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर 13 मेगापिक्सलच्या प्राइमरी सेंसर सह दोन 2 मेगापिक्सलचा सेंसर आणि एक एआई लेंस देण्यात आली तसेच सेल्फीसाठी हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्यालाला सपोर्ट करतो. Tecno Spark Power 2 Air डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई 3.5एमएम जॅक आणि इतर बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच रियर फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतो.

Realme C12

गेल्या महिन्यात लॉन्च झालेला रियलमी सी12 पण 6,000एमएएच च्या पावरफुल बॅटरीने सुसज्ज आहे जी 10वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा स्मार्टफोन रिवर्स चार्जिंग फीचरला सपोर्ट करतो. बाजारात हा फोन 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज सह आला आहे ज्याची किंमत 8,999 रुपये आहे. फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 20:9 आस्पेक्ट रेशियो असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे.

रियलमी सी12 अँड्रॉइड 10 आधारित रियलमी यूआई सह मीडियाटेकच्या हीलियो जी35 चिपसेट वर चालतो. हा फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्यालाला सपोर्ट करतो ज्यात 13 मेगापिक्सलच्या प्राइमरी सेंसर सह 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि 2 मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस देण्यात आला आहे. तसेच सेल्फीसाठी हा फोन 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्यालाला सपोर्ट करतो.

Xiaomi Redmi 9A

‘रेडमी 9’ सीरीज मध्ये 2 सप्टेंबरला लॉन्च झालेला Xiaomi Redmi 9A बाजारात दोन वेरिएंट्स मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. यातील 2 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वेरिएंट 6,799 रुपये तर 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वेरिएंट 7,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. शाओमी रेडमी 9ए 20:9 आस्पेक्ट रेशियो 6.53 इंचाच्या एचडी+ एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करतो.

हा फोन अँड्रॉइड 10 आधारित मीयूआई 12 सह मीडियाटेक हीलियो जी25 चिपसेट वर चालतो. फोटोग्राफीसाठी हा फोन 13 मेगापिक्सलच्या रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्यालाला सपोर्ट करतो. रियल डुअल सिम व 4जी वोएलटीई सपोर्ट सोबतच सिक्योरिटीसाठी फोन मध्ये फक्त फेस अनलॉक फीचर देण्यात आला आहे. हा फोन 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.

Infinix Smart 4 Plus

इनफिनिक्स ब्रँडने जुलै मध्ये आपला मोठी बॅटरी असलेला स्मार्टफोन इनफिनिक्स स्मार्ट 4 प्लस लॉन्च केला होता जो 10वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेल्या 6,000एमएएच च्या मोठ्या बॅटरी सह येतो. हा फोन 3 जीबी रॅम सह 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो आणि फक्त 7,999 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. हा फोन 20.5:9 आस्पेक्ट रेशियो असलेल्या 6.82 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो.

अँड्रॉइड 10 वर लॉन्च झालेला आहे हा फोन ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो ए25 प्रोसेसर वर चालतो. फोटोग्राफीसाठी Infinix Smart 4 Plus च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे ज्याचा प्राइमरी सेंसर 13 मेगापिक्सलचा आहे. सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्यालाला सपोर्ट करतो.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here