चिनी कंपन्यांचे दिवस भरले! 12 हजारांच्या आतील सर्व Chinese Mobile वर भारतात बंदी! सरकार करू शकतं मोठी घोषणा

भारतीय मोबाइल इंडस्ट्रीसाठी सर्वात मोठी बातमी म्हणता येईल. येत्या काळात 12,000 रुपयांपेक्षा कमी किंमतच्या सर्व चायनीज स्मार्टफोन भारतात बॅन होऊ शकतात. भारत सरकार Xiaomi, Redmi, Realme, OPPO, Vivo, POCO, Infinix आणि TECNO समवेत सर्व कमी किंमतीचे China Mobile Phone भारतात बॅन करू शकते.

China Mobile Phone Ban in India

12,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणारे सर्व मोबाइल फोन ज्यांची निर्मिती चीनी कंपन्यांद्वारे केली जाते, ते भारतात बॅन केले जाऊ शकतात. भारत सरकार लवकरच याबाबत आपल्या निर्णय घोषित करू शकते. ही बातमी ब्लूमबर्र्गच्या एका रिपोर्टमधून समोर आली आहे ज्यात 150 डॉलर्सपेक्षा कमी किंमतचे Chinese Smartphones भारतात बॅन होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. रिपोर्टनुसार, सरकारचा उद्देश या निर्णयाने LAVA आणि Micromax सारख्या स्वदेशी कंपन्यांना प्रोत्साहन देणं आहे.

भारत सरकारची योजना

महत्वाची बाब म्हणजे या रिपोर्टमध्ये कोणत्याही सरकारी किंवा सोर्सचा उल्लेख करण्यात आला नाही. त्यामुळे भारत सरकारची योजना काय आहे, याबाबत ठोस असं काही सांगता येणार नाही. तसेच रिपोर्टमधून सरकार एखादा नवीन कायदा लागू करेल की इतर कोणत्या कायदेशीर मार्गानी बंदी लागू करेल, हे स्पष्ट झालं नाही.

कोणाला बसणार झटका

सध्या भारतीय मोबाइल बाजारातील मोठ्या हिस्स्यावर चीनी कंपन्यांचे राज्य आहे, हे सत्य आहे. यात शाओमी, रेडमी, रियलमी, ओप्पो, विवो, पोको, इनफिनिक्स आणि टेक्नोच्या नावांचा समावेश आहे. जेव्हा प्रश्न एंट्री लेव्हल स्मार्टफोन किंवा लो बजेट मोबाइल फोन्सचा असतो तेव्हा भारतीय मोबाइल युजर देखील या ब्रँड्सवर जास्त विश्वास दाखवतात. त्यामुळे जर भारत सरकारनं खरंच 12,000 रुपयांपेक्षा कमी किंमतचे सर्व चीनी स्मार्टफोन भारतात बॅन केले तर नक्कीच या कंपन्यांना जोरदार धक्का बसेल.

स्वदेशी कंपन्यांचा फायदा

रिपोर्टनुसार 12,000 रुपयांच्या बजेटमधील सर्व Chinese Smartphones भारतीय बाजारात बॅन करून सरकार भारतीय मोबाइल ब्रँड्सना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करेल. याचा थेट फायदा जियो, मायक्रोमॅक्स आणि लावा सारख्या स्वदेशी कंपन्यांना होईल. तसेच भारत सरकारच्या या निर्णयानंतर Samsung आणि Nokia सारख्या नॉन चायनीज ब्रँड्सना देखील आपला विस्तार करण्यास मदत होईल. या दोन्ही कंपन्या लो बजेट मार्केटमध्ये जास्त सक्रिय होऊन स्वस्त स्मार्टफोन जास्त प्रमाणात लाँच करण्यास सुरु करतील.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here