कोणालाही न सांगता Jio नं बंद केले दोन लोकप्रिय प्लॅन; नवीन पर्याय न दिल्यामुळे युजर्स नाराज

Reliance Jio Adds Over 29 Lakh Mobile Subscribers Before Ambani 5G Service

Akash Mukesh Ambani यांची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जियो आता हळूहळू संपूर्ण देशात आपली 5जी सर्व्हिस लाँच करत आहे. एकीकडे वेगवान स्पीड देत असणारी कंपनी दुसरीकडे गुपचूप लोकप्रिय प्लॅन्स देखील बंद करत आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीनं एकत्र 12 4जी प्रीपेड प्लॅन बंद केले होते, ज्यात Disney+ Hotstar चं फ्री सब्सक्रिप्शन मिळत होतं. आता पुन्हा एकदा कंपनीनं कोणालाही न सांगता आपले दोन Recharge Plan बंद केले आहेत जे Disney+ Hotstar Premium subscriptions सह येत होते. म्हणजे आता फ्री मध्ये डिज्नी प्लस हॉटस्टार सब्सक्रिप्शन देणारा कोणताही प्लॅन उरला नाही.

युजर्स नाराज

Jio च्या या निर्णयानंतर आता जियोच्या ग्राहकांना आणि क्रिकेट प्रेमींना मोठा झटका बसला आहे, कारण आता त्यांना भारतीय क्रिकेट संघाच्या काही मॅचेस बघण्यासाठी Disney+ Hotstar चं सब्सक्रिप्शन खरेदी करावं लागेल. त्यामुळे ग्राहक नाराज झाले आहेत, त्यांनी आपली ही नाराजी सोशल मीडिया द्वारे व्यक्त केली आहे. हे देखील वाचा: Exclusive: लॅपटॉपपेक्षा जास्त रॅमसह येतोय iQOO 11 Legend; वनप्लसला टाकेल का मागे?

jio 5g works on 4g sim

कदाचित कंपनी डिज्नी प्लस हॉटस्टारसह आपले नवीन प्रीपेड प्लॅन लाँच करू शकते परंतु याबाबत सध्यातरी कोणतीही ठोस माहिती मिळाली नाही. बऱ्याचदा टेलीकॉम कंपन्या असे प्लॅन बंद करतात कारण त्यांना या प्लॅन्सच्या किंमती वाढवायच्या असतात. पुढे आम्ही तुम्हाला बंद करण्यात आलेल्या दोन्ही प्लॅनमध्ये मिळणाऱ्या बेनिफिट्सची माहिती दिली आहे.

हे प्लॅन झाले बंद

Jio नं Rs 1499 आणि Rs 4199 prepaid plans आपल्या वेबसाइटसह जियो अ‍ॅपवरून देखील हटवले आहेत. असं करण्यामागचं कारण कंपनीनं अधिकृतपणे सांगितलेलं नाही. तसेच परंतु या दोन्ही प्लॅनसह युजर्सना एक वर्षचं डिजनी+हॉटस्टार प्रीमियमचं सबस्क्रिप्शन मिळत होतं. हे देखील वाचा: परवडणाऱ्या किंमतीत आला Oppo चा 108MP कॅमेरा असलेला 5G Phone; फास्ट चार्जिंगसह Oppo A1 Pro लाँच

1. Jio चा 1,499 रुपयांच्या prepaid plan: या प्लॅन बद्दल बोलायचं तर यात युजर्सना 84 दिवसांच्या वैधतेसह डेली 2GB डेटा मिळत होता. म्हणजे प्लॅनमध्ये एकूण 168GB डेटा देण्यात आला होता. डेटा संपल्यावर देखील युजर्सना 64kbps इंटरनेट स्पीडवर डेटा वापरण्याची सुविधा होती. तसेच रिचार्जमध्ये रोज 100 SMS आणि अनलिमिटेड फ्री कॉलिंगचा फायदा देखील दिला जात होता. एक्सट्रा बेनिफिट्स पाहता प्लॅनमध्ये डिज्नी+ हॉटस्टार सोबतच free JioTV, JioSecurity आणि JioCinema चं subscriptions दिलं जात होतं.

2. Jio चा 4,199 रुपयांच्या prepaid plan: Reliance Jio च्या 4,199 रुपयांच्या prepaid plan मध्ये 365 दिवसांच्या वैधतेसह डेली 3GB डेटा मिळत होता. या रिचार्जमध्ये फ्री कॉलिंगसह डेली 100 SMS चा फायदा देखील दिले जात होते. इतकेच नव्हे तर युजर्सना डिज्नी+ हॉटस्टार के फ्री सब्सक्रिप्शन व्यतिरिक्त JioTV, JioCinema, JioCloud आणि JioSecurity सारखे बेनिफिट्स देण्यात येत होते.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here