BSNL बंद करणार आहे 75 दिवस वॅलिडिटी असलेला प्लॅन; लवकरच घ्या फायदा

BSNL Plan: प्रायव्हेट टेलीकॉम कंपनी Reliance Jio, Airtel आणि Vodafone Idea ला गेले कित्येक दिवस सरकारी कंपनी संचार निगम लिमिटेड (BSNL) आव्हान देत आहे. यासाठीच कंपनीनं 75व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने कमी बजेटमध्ये दीर्घ वैधता आणि जास्त डेटा असलेला एक ब्रॉडबँड प्लॅन सादर केला होता जो लवकरच बंद होणार आहे. जर तुम्ही BSNL Broadband Users असाल तर हा प्लॅन बंद होण्याआधीच रिचार्ज करून दीर्घ वैधता, डेटा आणि अनेक बेनिफिट्सचा लाभ घेता येईल. पुढे आम्ही तुम्हाला प्लॅनची किंमत आणि त्यात मिळणाऱ्या बेनिफिट्ससह प्लॅन बंद होण्याची शेवटची तारीख सांगितली आहे.

प्लॅनची शेवट तारीख

आम्ही ज्या प्लॅन बाबत बोलत आहोत तो आहे BSNL चा 775 रुपयांचा ब्रॉडबँड प्लॅन, जो कंपनीनं 75व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने एक ऑफर म्हणून सादर केला होता. ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी असेल असं देखील कंपनीनं स्पष्ट केलं होतं. आता या ऑफरचा कालावधी संपत आला आहे. आता 15 नोव्हेंबर, 2022 ला कंपनी हा प्लॅन आपल्या ब्रॉडबँड प्लॅनच्या यादीतून हटवणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला पुढील दिलेले या पॅकचे बेनिफिट आवडत असतील तर तुम्ही 15 नोव्हेंबर आधी रिचार्ज करू शकता. हे देखील वाचा: 200MP कॅमेऱ्यासह येईल Samsung Galaxy S23 Ultra; संपूर्ण Galaxy S23 सीरीजच्या लाँच डेटचा खुलासा

200GB मिळेल डेटा आणि 75 दिवसांची वैधता

बीएसएनएलच्या प्लॅन बद्दल बोलायचं तर यात ग्राहकांना 75 दिवसांची वॅलिडिटी दिली जात आहे. तसेच, 775 रुपयांच्या या प्लॅनमध्ये डेटा देखील काही कमी नाही. रिचार्जमध्ये 150 Mbps इंटरनेट स्पीड आणि 2000 GB (2TB) इंटरनेट डेटा दिला जात आहे. इतकेच नव्हे तर मिळणारा डेटा अनलिमिटेड आहे म्हणजे 2TB डेटाचा वापर केल्यानंतर ग्राहकांचा इंटरनेट स्पीड कमी होईल 10 Mbps होईल परंतु, इंटरनेट मिळत राहील. तसेच, यात अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगचा समावेश देखील कंपनीनं केला आहे.

OTT बेनिफिट्स

प्लॅनमध्ये डेटा आणि कॉलिंग सोबतच OTT (ओव्हर-द-टॉप) बेनिफिट्स देखील दिले जात आहेत. या प्लॅनसह ग्राहकांना ओटीटी बेनिफिट्स म्हणून Disney+ Hotstar, SonyLIV, ZEE5, Voot, Lionsgate, Shemaroo, Hungama आणि Yupp TV चं फ्री सब्सक्रिप्शन मिळेल. हे देखील वाचा: 49 रुपयांमध्ये 5 OTT अ‍ॅप्सचं सब्सस्क्रिप्शन; Dish TV नं आणले चार नवीन प्लॅन, सर्वांना येणार वापरता

नोट: हा ब्रॉडबँड प्लॅन बीएसएनएल भारत फायबर अंतगर्त उपलब्ध आहे. याचा अर्थ असा की जर तुम्ही आतापर्यंत बीएसएनएलचे ग्राहक नसाल तर तुम्ही फायबर ब्रॉडबँड डोमेनमध्ये बीएसएनएलची सर्व्हिसचा आनंद घेण्यासाठी या प्लॅनचा विचार करू शकता.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here