नुकतीच बातमी आली आहे की 12,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे सर्व Chinese Smartphone भारतात बॅन केले जातील. त्यामुळे टेक विश्वात चर्चाना उधाण आलं आहे. तसेच आज चीनी स्मार्टफोन कंपन्यांसंबंधित अजून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्यानुसार जर्मनीमध्ये OPPO आणि OnePlus च्या Mobile Phones च्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे आणि आता तिथे या दोन्ही चीनी कंपन्या आपले स्मार्टफोन्स विकू शकणार नाहीत.
OPPO OnePlus BAN
OPPO आणि OnePlus ब्रँड जर्मनीमध्ये बॅन झाले आहेत. या बातमीमुळे चीनी कंपन्यांना जोरदार धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी Nokia नं पेटंट उल्लंघनच्या एका प्रकरणात ओप्पो आणि वनप्लसला कोर्टात खेचलं होतं. कोर्टाच्या कारवाईनंतर OnePlus आणि OPPO या प्रकरणात दोषी सिद्ध झाल्या आहेत. तसेच आता या दोन्ही कंपन्यांना शिक्षा म्हणून जर्मनीमध्ये आपले स्मार्टफोन्स विकत येणार नाहीत.
ओप्पो-वनप्लस प्रकरण आहे तरी काय?
नोकियानं ओप्पो आणि वनप्लस या दोन्ही कंपन्यांच्या स्मार्टफोनमध्ये जी 5जी टेक्नॉलॉजी वापरली जात आहे तिचं पेटंट फक्त नोकियाकडे आहे. OPPO आणि OnePlus कंपनी Nokia ची 5G technology परवान्याविना वापरत आहेत, असा आरोप नोकियानं केला होता. म्यूनिक कोर्टानं या प्रकरणात ओप्पो आणि वनप्लसला दोषी करार केलं आहे. त्यामुळे आता या चीनी कंपन्या जर्मनीमध्ये आपले स्मार्टफोन विकू शकणार नाहीत.
हे संपूर्ण प्रकरण गेल्या महिन्यात म्हणजे जुलै 2022 मधील आहे आणि कोर्टचा निर्णय आल्यानंतर आता या दोन्ही कंपन्यांनी जर्मनीमध्ये आपल्या अधिकृत वेबसाइटवरून सर्व आपले स्मार्टफोन्स हटवले आहेत. रिपोर्ट्सनुसार फक्त जर्मनीच नव्हे तर या दोन्ही चिनी ब्रँड्स विरोधात नोकिया फ्रांस, स्पेन, फिनलैंड, स्वीडन, नेदरलँड्स आणि ग्रेट ब्रिटेनमध्ये देखील केस लढत आहे.
भारतात चिनी स्मार्टफोन बॅन
येत्या काळात 12,000 रुपयांपेक्षा कमी किंमतच्या सर्व चायनीज स्मार्टफोन भारतात बॅन होऊ शकतात. भारत सरकार Xiaomi, Redmi, Realme, OPPO, Vivo, POCO, Infinix आणि TECNO समवेत सर्व कमी किंमतीचे China Mobile Phone भारतात बॅन करू शकते.
12,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणारे सर्व मोबाइल फोन ज्यांची निर्मिती चीनी कंपन्यांद्वारे केली जाते, ते भारतात बॅन केले जाऊ शकतात. भारत सरकार लवकरच याबाबत आपल्या निर्णय घोषित करू शकते. ही बातमी ब्लूमबर्र्गच्या एका रिपोर्टमधून समोर आली आहे ज्यात 150 डॉलर्सपेक्षा कमी किंमतचे Chinese Smartphones भारतात बॅन होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. रिपोर्टनुसार, सरकारचा उद्देश या निर्णयाने LAVA आणि Micromax सारख्या स्वदेशी कंपन्यांना प्रोत्साहन देणं आहे.

















