Samsung Galaxy A54 5G फोनची चर्चा जवळपास तीन-चार महिन्यांपासून टेक विश्वात सुरु आहे. 91मोबाइल्सनं ऑनलीक्ससह मिळून या फोनची रेंडर ईमेज आणि व्हिडीओ देखील शेयर केला होता, ज्यात फुल लुक आणि डिजाईनचा खुलासा झाला होता. विविध बातम्यांनुसार या स्मार्टफोनकॅच्या फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे तसेच आता हा सॅमसंग फोन चीनी सर्टिफिकेशन्स साइट टेनावर लिस्ट झाला आहे. या लिस्टिंग सोबतच फोनच्या किंमतीचा खुलासा देखील झाला आहे ज्याची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.
Samsung Galaxy A54 5G ची लीक किंमत
सॅमसंग गॅलेक्सी ए54 5जी फोनबद्दल सांगण्यात आलं आहे की हा दोन मेमरी व्हेरिएंटमध्ये लाँच केला जाऊ शकतो. बेस व्हेरिएंटमध्ये 8 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेज दिली जाऊ शकते तर मोठा व्हेरिएंट 8 जीबी रॅम व 256 जीबी स्टोरेजसह लाँच केला जाऊ शकतो. बेस व्हेरिएंटची किंमत 530 यूरो ते 550 यूरो दरम्यान सांगण्यात आली आहे जी 46,000-48,000 रुपयांच्या आसपास आहे तसेच मोठ्या व्हेरिएंटची किंमत 590-610 यूरो म्हणजे 52,000 ते 53,500 रुपये दरम्यान असू शकते. हे देखील वाचा: लाँच होण्याआधीच Flipkart लिस्ट झाली Vivo V27 सीरीज; शानदार डिजाइन आणि फीचर्ससह येणार बाजारात
Samsung Galaxy A54 5G Specifications
- 6.4″ FHD+ 120Hz AMOLED
- Samsung Exnos 1380
- 8GB RAM + 256GB Storage
- 50MP Triple Rear Camera
- 25W 5,000mAh Battery
सॅमसंग गॅलेक्सी ए54 5जी चीनी सर्टिफिकेशन्स साइट टेना वर SM-A5400 मॉडेल नंबरसह लिस्ट करण्यात आला आहे. लिस्टिंगनुसार हा स्मार्टफोन सॅमसंगच्या एक्सनॉस 1380 चिपसेटसह लाँच केला जाऊ शकतो. हा प्रोसेसर मल्टीपल 5जी बँडला सपोर्ट करू शकेल. टेना नुसार हा मोबाइल फोन 8 जीबी रॅमसह लाँच होईल जो 128 जीबी स्टोरेज तसेच 512 जीबी स्टोरेजच्या दोन व्हेरिएंट्समध्ये सेलसाठी उपलब्ध होऊ शकतो.
Samsung Galaxy A54 5G स्मार्टफोनमध्ये 6.4 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले दिला जाऊ शकतो. ही फोन स्क्रीन अॅमोलेड पॅनलवर बनली असेल जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करेल. चर्चा आहे की हा मोबाइल फोन Awesome White, Awesome Graphite, Awesome Lime आणि Awesome Violet कलरमध्ये मार्केटमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल. हे देखील वाचा: शानदार डिस्प्लेसह येईल परवडणारा OnePlus Nord 3; स्पेसिफिकेशन झाले लीक
फोटोग्राफीसाठी या फोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा असल्याचं सांगण्यात आलं आहे. असं सांगण्यात आलं आहे की मोबाइलच्या रियर पॅनलवर 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर असू शकतो जो 12 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड लेन्स आणि 8 मेगापिक्सल थर्ड सेन्सरसह काम करू शकतो. पावर बॅकअपसाठी या सॅमसंग फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी असल्याचा खुलासा देखील टेना वर झाला आहे जी 25वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येऊ शकतो.