पोकोची एक्स सीरिज भारतीय बाजारात खूप लोकप्रिय ठरली आहे. बजेट सेगमेंटमध्ये शानदार स्पेक्स देण्यासाठी ही सीरिज ओळखली जाते. आज कंपनीनं या सीरिजचा विस्तार करत POCO X5 Pro 5G भारतीय बाजारात लाँच केला आहे. यात 108MP Rear Camera, 8GB RAM, Qualcomm Snapdragon 778G चिपसेट, 67W fast charging आणि 5,000mAh ची Battery देखील मिळते. चला जाणून घेऊया 7 5जी बँड्सचा सपोर्ट असलेल्या या फोनचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत.
POCO X5 Pro 5G ची किंमत
POCO X5 Pro 5G स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट भारतीयांच्या भेटीला आले आहेत. याच्या बेस मॉडेलमध्ये 6GB RAM सह 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. तर टॉप व्हेरिएंटमध्ये 8GB RAM सह 256GB स्टोरेज मिळते. कंपनीनं बेस मॉडेलची किंमत 22,999 रुपये ठेवली आहे, तर मोठा मॉडेल 24,999 रुपयांमध्ये उपलब्ध होईल.
लाँच ऑफर अंतर्गत कंपनी ग्राहकांना 2000 रुपयांचा डिस्काउंट देत आहे, जो आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डवर उपलब्ध असेल. POCO X5 Pro ची विक्री येत्या 13 फेब्रुवारीला ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर सुरु होईल. तसेच कंपनीनं आज म्हणजे 6 फेब्रुवारीला फ्लिपकार्टच्या माध्यमातून संध्याकाळी 6 वाजल्यापासून अर्ली ऍक्सेस सेल देखील आयोजित केला आहे. हे देखील वाचा: वनप्लसपेक्षा स्वस्त झाला Samsung Galaxy S22, जुना स्टॉक संपवण्यासाठी किंमतीत मोठी कपात
POCO X5 Pro 5G Specifications
- 6.67″ FHD+ AMOLED Display
- 8GB RAM + 256GB Storage
- Qualcomm Snapdragon 778G
- 108MP Triple Rear Camera
- 67W 5,000mAh Battery
पोको एक्स5 प्रो 5जी फोनमध्ये 6.67 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या पंच-होल स्टाईल अॅमोलेड पॅनल स्क्रीनला कंपनीनं एक्सफिनिटी डिस्प्ले असं नाव दिलं आहे. हा डिस्प्ले 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटवर चालतो. फोन स्क्रीन 900निट्स ब्राइटनेस, एचडीआर10+ आणि डॉल्बी व्हिजनला सपोर्ट करते.
POCO X5 Pro 5G फोन अँड्रॉइड 12 ओएसवर लाँच झाला आहे जो मीयुआय 14 येतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 6नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 778जी प्रोसेसर देण्यात आला आहे जो 2.4गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीडवर चालतो. तसेच ग्राफिक्ससाठी या फोनमध्ये एड्रेनो 642एल जीपीयू आहे. हा फोन LPDDR4X RAM आणि UFS 2.2 Storage टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो.
फोटोग्राफीसाठी पोको एक्स5 प्रो मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. फोनच्या बॅक पॅनलवर एफ/1.9 अपर्चर असलेला 108MP ISOCELL HM2 सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.2 अपर्चर 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि एफ/2.4 अपर्चर 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेन्ससह येतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा पोको फोन एफ/2.45 अपर्चर असलेल्या 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: विवोचा सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन लाँच; Vivo X90 आणि Vivo X90 Pro येत आहेत भारतात
POCO X5 Pro 5G फोन ड्युअल सिमला सपोर्ट करतो जो 5जी आणि 4जी दोन्हीवर चालतो. पावर बॅकअपसाठी या मोबाइल फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 67वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते. हा पोको फोन 12 लेयर वाले ग्रॅफाइट कूलिंग सिस्टमसह येतो जी गेमिंग दरम्यान फोनला थंड ठेवते. हा फोन आयपी53 सर्टिफाइड आहे ज्यामुळे पाणी आणि धुळीपासून डिवाइस सुरक्षित राहतो.