रेडमी-रियलमीला धोबीपछाड देणार! OnePlus Nord 3 आणि Nord Watch येतायत भारतात

एकेकाळी फक्त फ्लॅगशिप स्मार्टफोन सादर करणारी OnePlus कंपनी सध्या मिडरेंज सेगमेंटमध्ये देखील सक्रिय झाली आहे. कंपनीचा किफायतशीर ब्रँड Nord ला ग्राहक पसंती देत आहेत. त्यामुळे आता या ब्रँडच्या विस्ताराची योजना बनवली जात आहे. कंपनी नॉर्ड सीरीज अंतगर्त भारतात लवकरच विविध प्रोडक्ट लाँच करणार आहे. प्रसिद्ध टिप्सटर मुकुल शर्मानं एक ट्वीट करून माहिती दिली आहे की कंपनी लवकरच भारतात OnePlus Nord 3 स्मार्टफोन, OnePlus Nord वॉच, OnePlus Nord फिटनेस बँड आणि Nord ब्रँडचे स्मार्ट AIoT प्रोडक्ट लाँच करणार आहे. नॉर्ड ब्रँडच्या आगामी डिवाइसेस पैकी सध्यातरी आम्हाला OnePlus Nord 3 स्मार्टफोन आणि OnePlus Nord वॉचची माहिती मिळाली आहे.

OnePlus Nord 3 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

आगामी OnePlus Nord 3 स्मार्टफोन काही महिन्यांपूर्वी BIS च्या डेटाबेसमध्ये दिसला होता. या लिस्टिंगमधून आणि लिक्समधून स्मार्टफोनच्या महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, वनप्लसचा आगामी Nord 3 स्मार्टफोन मीडियाटेकच्या Dimensity 8100 प्रोसेसरसह बाजारात येऊ शकतो. हा किफायतशीर स्मार्टफोन 6.7-इंचाच्या AMOLED डिस्प्लेसह सादर केला जाऊ शकतो. या डिस्प्लेचं रिजोल्यूशन Full HD+ (1080 x 2412) पिक्सल असेल. तसेच डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz असू शकतो. OnePlus च्या या आगामी स्मार्टफोनमध्ये पंच होल कटआउट डिस्प्ले मिळेल, ज्यात सेल्फी कॅमेरा फिट करण्यात येईल. हे देखील वाचा: 150W फास्ट चार्जिंग आणि 16GB RAM सह दणकट OnePlus Ace Pro लाँच, पाहा याची पावर

फोटोग्राफीसाठी या आगामी वनप्लसमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. वनप्लस नॉर्डमध्ये 50MP IMX766 सेन्सर प्रायमरी कॅमेऱ्याचं काम करेल. तसेच फोनमध्ये प्रायमरी कॅमेरा सेन्सरसह 8-मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा आणि 2MP चा कॅमेरा सेन्सर मिळू शकतो. वनप्लसच्या या फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16MP चा सेल्फी कॅमेरा असेल. यात 12GB LPDDR5 RAM आणि 256GB पर्यंतची UFS 3.1 स्टोरेज दिली जाऊ शकते. फोनमध्ये 4,500mAh ची बॅटरी आणि 150W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळू शकतो. हे देखील वाचा: आता नाही मिळणार OPPO आणि OnePlus चे स्मार्टफोन्स; ‘या’ देशात पूर्णपणे बॅन झाले हे दोन्ही चीनी ब्रँड

OnePlus Nord Watch

टिपस्टर मुकुल शर्मानं 91mobiles ला सांगितलं आहे की OnePlus Nord Watch पाच वेगवेगळ्या डिजाइनसह सादर केलं जाईल. वनप्लसच्या Nord Watch मध्ये रक्तातील ऑक्सिजन लेव्हल सांगण्यासाठी SpO2 सेन्सर, हृदयावर लक्ष ठेवण्यासाठी हार्ट रेट मॉनीटर आणि स्लीप ट्रॅकिंग फीचर दिलं जाईल, अशी चर्चा आहे. तसेच हे वॉच ब्लॅक आणि व्हाइट अशा दोन कलरमध्ये सादर केलं जाऊ शकतं. नॉर्ड सीरीज वॉचची किंमत 5,000 रुपये ते 8,000 रुपयांपर्यंत असू शकते.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here