स्वस्तात खूप पावरफुल स्मार्टफोन! पुढील आठवड्यात येतोय POCO M5, कंपनीनं सांगितली किंमत

Xiaomi चा सब-ब्रँड म्हणून बाजारात आलेल्या POCO नं स्मार्टफोन मार्केटमध्ये चार वर्ष पूर्ण केली आहेत. ऑगस्ट 2018 मध्ये पहिला पोको फोन लाँच झाला होता आणि आता ऑगस्ट 2022 मध्ये कंपनीनं आपल्या लेटेस्ट स्मार्टफोन POCO M5 लाँचची घोषणा केली आहे. पोको एम5 5 सप्टेंबरला भारतात लाँच होईल. कंपनीनं POCO M5 स्मार्टफोन 10,000 ते 13,000 रुपयांच्या बजेटमध्ये सर्वात पावरफुल स्मार्टफोन असल्याचं सांगितलं आहे.

POCO M5 Launch

पोको एम5 स्मार्टफोन येत्या 5 सप्टेंबरला भारतीय बाजारात सादर केला जाईल. हा एक ग्लोबल लाँच इव्हेंट असेल त्यामुळे भारतासह जगभरात देखील POCO M5 स्मार्टफोनची एंट्री होईल. 5 सप्टेंबरला पोको एम5 चा लाँच भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. पोको एम 5 स्मार्टफोन कंपनी “Most Powerful Smartphone within 10-13k price segment in year 2022” या टॅगलाइनसह प्रोमोट करत आहे. म्हणजे पोको एम5 10 हजार ते 13 हजार बजेटमधील सर्वात पावरफुल मोबाइल फोन असू शकतो, असा दावा शाओमी सब-ब्रँड पोको करत आहे. हे देखील वाचा: कमी किंमतीत जबरदस्त स्पेसिफिकेशन्स; 64MP Camera असलेला Redmi Note 11 SE भारतात लाँच

POCO M5 चे स्पेसिफिकेशन्स

5 सप्टेंबरला लाँच होणाऱ्या पोको एम5 एक 4जी स्मार्टफोनबाबत सांगितलं जात आहे की हा मीडियाटेक हीलियो जी99 चिपसेटसह बाजारात येईल. विशेष म्हणजे भारतात आतापर्यंत फक्त Infinix Note 12 Pro या चिपसेटसह आला आहे. तसेच चिनी कंपनी विवोचा आगामी हँडसेट Vivo V25e बद्दल देखील चर्चा आहे की त्यात MediaTek Helio G99 चिपसेटचाच वापर केला जाईल.

POCO M5 चे अन्य स्पेसिफिकेशन्स पाहता, लीक्सनुसार हा मोबाइल फोन 6.58 इंचाच्या फुलएचडी+ एलसीडी डिस्प्लेसह लाँच होईल जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालेल. यामुळे स्मूद डिस्प्ले एक्सपीरियन्स मिळेल. तसेच पोको एम5 मध्ये अँड्रॉइड 12 आधारित मीयुआय 13 व्हर्जन मिळू शकतो. ही लेटेस्ट अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम आहे. हे देखील वाचा: 20 हजारांच्या आत मिळणारे हे आहेत बेस्ट 5G फोन; दिवाळीत येणारं 5G Network वापरण्यासाठी व्हा सज्ज

फोटोग्राफीसाठी पोको एम5 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. सध्यातरी या कॅमेऱ्याची मेगापिक्सल पावर समोर आली नाही. पावर बॅकअपसाठी POCO M5 मध्ये 33वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 5,000एमएएच मोठी बॅटरी दिली जाऊ शकते. आशा आहे की भारतात हा फोन 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेजसह लाँच होईल ज्याची किंमत 13,000 रुपयांपेक्षा कमी असेल.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here