Activa E electric scooter launch: Honda Motorcycle & Scooter India Pvt. Ltd. (HMSI) आपली नवीन Activa electric scooter भारतीय बाजारात सादर करण्याची योजना बनवत आहे. अफवांवर विश्वास ठेवल्यास Activa E शानदार रेंज आणि जबरदस्त फीचर्ससह सादर केली जाऊ शकते. आता समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार Japanese motorcycle manufacturer आपली नवीन electric two-wheeler 2023 च्या अखेरपर्यंत सादर करू शकते. तसेच Honda आपली नवीन इलेट्रिक स्कूटर ‘Made for India’ प्लॅटफॉर्मवर सादर करू शकते.
Honda Activa E India launch
आतापर्यंत समोर आलेल्या रिपोर्टवरून स्पष्ट झालं आहे की Honda आपल्या सर्वात लोकप्रिय मॉडेल Honda Activa सह भारतात EV स्कूटर सेगमेंटमध्ये पदार्पण करेल. Honda Activa चं पेट्रोल व्हर्जन भारतात खूप लोकप्रिय आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार होंडा अॅक्टिव्हा इलेक्ट्रिक स्कूटर बॅटरी स्वॅपिंग टेक्नॉलॉजीसह सादर केली जाऊ शकते. या टेक्नॉलॉजीच्या मदतीनं युजर्सना स्वॅप स्टेशन्सवर चार्ज केलेल्या बॅटरीसह डिस्चार्ज करण्यात आलेली बॅटरी बदलण्याचा आणि घरात बॅटरी चार्ज करण्याचा देखील एक ऑप्शन मिळेल. अशी टेक्नॉलॉजी काही दिवसांपूर्वी लाँच झालेल्या बाउंस इन्फिनिटी ई1 मध्ये मिळाली आहे. हे देखील वाचा: 150KM च्या जबरदस्त रेंजसह येतेय Electric Bike; पुढील आठवड्यात होणार लाँच
स्वॅपेबल बॅटरी टेक्नॉलॉजी म्हणजे काय?
जर तुम्हाला बॅटरी स्वॅपिंग म्हणजे काय असा प्रश्न पडला असेल तर आधी त्याबाबत जाणून घेऊया. या टेक्नॉलॉजीमुळे ग्राहकांना वारंवार वाहनांची बॅटरी चार्ज करावी लागत नाही. युजर आपल्या इलेक्ट्रिक व्हेईकलमधील बॅटरी व्यतिरिक्त अतिरिक्त बॅटरी देखील बाळगू शकतात आणि गरज पडल्यास सहज ई-व्हेईकलची बॅटरी बदलू शकतात.
कोणत्याही इलेक्ट्रिक वाहनाची बॅटरी चार्ज करण्यास खूप वेळ लागतो त्यामुळेच अनेकजण इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत नाहीत. बॅटरी स्वॅपिंग एक चांगला ऑप्शन आहे, इथे फुल चार्ज झालेली बॅटरी चार्जिंग स्टेशनवर किंवा घरी रेडी असते, युजरला फक्त डिस्चार्ज बॅटरीच्या जागी फुल चार्ज बॅटरी फिट करावी लागेल. त्यामुळे काही मिनिटातच इलेक्ट्रिक वाहन पुन्हा वापरता येईल आणि तेही फुल रेंजसह. हे देखील वाचा: ही कंपनी देत आहेत मोफत Electric Scooter, अशी आहे ही भन्नाट ऑफर
Honda Activa Electric चे प्रतिस्पर्धी
होंडा अॅक्टिव्हा ईला भारतातील ईव्ही स्कूटर बाजारात आधीपासून उपलब्ध असलेल्या इलेक्ट्रिक स्कूटरकरून चांगली टक्कर मिळणार, हे ठरलेलं आहे. कंपनीला ओला एस 1, बजाज चेतक आणि हीरो इलेक्ट्रिक एनवायएक्स एचएक्स सारख्या व्हेईकलना मागे टाकावं लागेल. येत्या काळात होंडा अन्य ऑटोमोबाइल दिग्ग्जना टक्कर देण्यासाठी आपल्या होंडा अॅक्टिव्हा ई बाबत अधिकृत माहिती देऊ शकते.
















