Mobile Phone सध्या माणसाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे, त्यामुळे सतत आपल्या आजूबाजूला फोन असतोच. कधी हातात, तर कधी खिशात आणि झोपताना उशाला देखील आपण स्मार्टफोन ठेवतो. परंतु दिवस-रात्र आपल्या सोबत असलेली वस्तू बॉम्ब प्रमाणे फुटत असली तर काय होईल? चीनी कंपनी Xiaomi चा मोबाइल फोन पुन्हा एकदा बॉम्ब बनला आहे. Redmi 6A Blast झाल्याची बातमी नुकतीच आली आहे आणि या दुर्घटनेत एका झोपेत असलेल्या महिलेचा मृत्यू देखील झाला आहे.
Xiaomi Phone Blast
रेडमी 6ए ब्लास्टची बातमी एका व्यक्तीनं आपल्या ट्वीटर हँडलवर पोस्ट केली आहे. या ट्वीटमध्ये मनजीत नावाच्या व्यक्तीनं काही फोटोज शेयर करत दावा केला आहे की त्यांच्या काकीचा मृत्यु Xiaomi Redmi 6A Blast मुळे झाला आहे. आपल्या ट्वीटमध्ये मनजीतनं ब्लास्ट झालेल्या मोबाइल फोनच्या फोटो सोबतच मृत महिलेचा फोटो देखील शेयर केला आहे ज्यात मृतदेह स्पष्ट दिसत आहे. हे देखील वाचा: OPPO करणार धमाका! 64MP कॅमेरा आणि 8GB रॅम असलेल्या OPPO F21s Pro Series ची लाँच देतं ठरली
हे ट्वीट खूप संवेदनशील आहे त्यामुळे विवेक बाळगण्याचा सल्ला दिला जात आहे.
Hi @RedmiIndia @manukumarjain@s_anuj Yesterday in Night my Aunty found dead ?, she was using Redmi 6A, she was sleeping & she kept the phone near her face on pillow side & after sometime her phone blast. It's a bad time for us. It's a responsibility of a brand to support? pic.twitter.com/9EAvw3hJdO
— MD Talk YT (Manjeet) (@Mdtalk16) September 9, 2022
रेडमी फोनमध्ये स्फोट
मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिला आपला रेडमी 6ए स्मार्टफोन बिछान्यावर उशीला कडेला ठेऊन झोपली होती. महिला जेव्हा झोपेत होती तेव्हा अचानकपणे तिच्या उशीवर ठेवण्यात आलेल्या शाओमी फोनमध्ये ब्लास्ट झाला आहे. हा स्फोट इतका जबरदस्त होता की तेव्हा महिलेच्या डोक्याला मार बसला होता तसेच अंथरुणातच तिचा मृत्यू झाला. शेयर केलेल्या फोटोजमध्ये बिछान्यावर रक्त दिसत दिसत आहे. तसेच फोन देखील पूर्णपणे जळाला आहे. हे देखील वाचा: रेडमी-रियलमीला मोटोरोलाचा दणका! स्वस्त आणि मस्त Moto E22 ची माहिती लीक; असा दिसेल हँडसेट
शाओमीनं व्यक्त केला शोक
ट्वीटवर रेडमी तसेच कंपनीच्या उच्च अधिकाऱ्यांना टॅग केल्यानंतर कंपनीकडून उत्तर आलं आहे तसेच या प्रकरणाचा तपास करण्याचा दिलासा देण्यात आला आहे. परंतु या मोठ्या दुर्घटनेनंतर कंपनी मृतकाच्या कुटुंबाला नुकसान भरपाई देईल की नाही हे पाहण्यासाठी थोडी वाट पाहावी लागेल. त्यापेक्षाही मोठी बाब अशी आहे की Xiaomi Redmi 6A Blast च्या मागे कंपनी आपल्या प्रोडक्ट मधील दोष मान्य करेल की युजरची चूक म्हणून खापर युजरवर फोडेल, ही देखील महत्वाची बाब म्हणता येईल.















