शाओमीचा बाहुबली फोन! 200MP Camera आणि 120W फास्ट चार्जिंगसह Xiaomi 12T Pro ची दणक्यात एंट्री

Xiaomi 12T Pro launched with 200mp camera and 120W fast charging low price specifications details

Xiaomi 12T Pro Launch: Xiaomi नं टेक मंचावर आपली बहुप्रतीक्षित शाओमी 12टी सीरीज सादर केली आहे. सीरीज अंतगर्त कंपनीने दोन पावरफुल स्मार्टफोन Xiaomi 12T, Xiaomi 12T Pro लाँच केले आहेत. दोन्ही मोबाइल फोन स्टाईलिश लुक आणि पावरफुल स्पेसिफिकेशन्ससह बाजारात आले आहेत. यातील शाओमी 12टी प्रो मध्ये 200MP Camera, 12GB RAM, Qualcomm Snapdragon 8+ Gen1 chipset आणि 120W fast charging सारखे दणकट स्पेसिफिकेशन्स मिळतात. Xiaomi 12T Pro Price आणि specifications ची माहिती पुढे आहे.

Xiaomi 12T Pro specifications

200 Megapixel Camera

शाओमी 12टी प्रो स्मार्टफोन शक्तिशाली कॅमेऱ्यासह बाजारात आला ज्याच्या बॅक पॅनलवर 200 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. ही कॅमेरा लेन्स ओआयएस फीचरला सपोर्ट करते. ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 200एमपी सेन्सर सोबतच 119डिग्री एफओवी 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स तसेच 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स देखील देण्यात आली आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Xiaomi 12T Pro 20MP IMX596 Selfie sensor ला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: चार्जिंगविना 100KM धावेल ही स्वस्त Electric Scooter; आग लागण्याची देखील भीती नाही

Xiaomi 12T Pro launched with 200mp camera and 120W fast charging low price specifications details

Xiaomi 12T Pro display

शाओमी 12टी प्रो स्मार्टफोन 2712 x 1220 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.67 इंचाच्या फुलएचडी+ पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो. ही स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेट तसेच 480हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटवर चालते. फोन डिस्प्लेमध्ये 1200निट्स ब्राइटनेस आणि एचडीआर10+ सारखे फीचर्स देखील मिळतात. स्क्रीन प्रोटेक्शनसाठी Xiaomi 12T Pro मध्ये कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 चा वापर करण्यात आला आहे.

Xiaomi 12T Pro processor

शाओमी 12टी प्रो अँड्रॉइड 12 आधारित मीयुआय 13 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8प्लस जेन1 चिपसेट देण्यात आला आहे तसेच ग्राफिक्ससाठी हा मोबाइल फोन एड्रेनो जीपीयूला सपोर्ट करतो. Xiaomi 12T Pro 12 जीबी पर्यंत रॅम आणि 256 जीबी पर्यंतच्या इंटरनल स्टोरेजसह लाँच झाला आहे जो LPDDR5 RAM आणि UFS 3.1 storage टेक्नॉलॉजीवर चालतो.

Xiaomi 12T Pro Battery

शाओमीनं आपला हा मोबाइल फोन पावरफुल स्पेसिफिकेशन्स सोबतच तगड्या बॅटरीसह देखील सादर केला आहे. हा स्मार्टफोन 5,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो जी 120वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते. या टेक्नॉलॉजीच्या जीवावर Xiaomi 12T Pro फक्त काही मिनिटांत 0 ते 100 टक्क्यांपर्यंत चार्ज होतो. चार्जिंगसाठी यात यूएसबी टाईप सी पोर्ट देण्यात आला आहे. हे देखील वाचा: आयफोनच्या तोडीचा फोन आज येतोय! भारतात देखील Google Pixel 7, Pixel 7 Pro होणार लाँच, जाणून घ्या किंमत

Xiaomi 12T Pro Price

शाओमी 12टी प्रो स्मार्टफोन दोन व्हेरिएंट्समध्ये सादर करण्यात आला आहे ज्यात 8 जीबी रॅम आणि 12 जीबी रॅम देण्यात आली आहे. या फोनचा बेस प्राइस EUR 749 आहे जी भारतीय करंसीनुसार 60,500 रुपयांच्या आसपास आहे तसेच हा फोन Black, Blue आणि Silver कलरमध्ये लाँच झाला आहे. Xiaomi 12T Pro India Launch बद्दल अजूनतरी कोणतीही अधिकृत माहिती आली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here