Flying Taxi: चिनी कंपनीनं सोमवारी इलेक्ट्रिक फ्लाइंग टॅक्सी टीज केली आहे. फ्लाइंग टॅक्सी ट्रॅफिकच्या समस्येपासून मुक्तता करण्यासाठी सादर करण्यात आली आहे. कंपनीनुसार, हिच्या मदतीनं पॅसेंजर कमी वेळात लवकरच आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचू शकतात. ही फ्लाइंग टॅक्सी चिनी कंपनी XPeng Inc नं सादर केली आहे. XPeng जगभरात अनेक फ्लाइंग ऑटोमोबाइल प्रोजेक्ट XPeng X2 नावानं चालवत आहे. न्यूज एजन्सी PTI च्या रिपोर्टनुसार, फ्लाइंग टॅक्सी प्रोजेक्टमध्ये आतापर्यंत काही प्रमाणात यशस्वी प्रवासी टेस्ट झाल्या आहेत.
फ्लाइंग टॅक्सी प्रोजेक्टच्या या डेमोनस्ट्रेशनची झलक पाहून समजतं की नजीकच्या भविष्यात एक दिवस कटिंग एज टेक्नॉलॉजीच्या मदतीनं पॅसेंजर शहरातील ट्रॅफिकमधून रस्त्याच्या वर उडून आपल्या इच्छित स्थळी पोहोचू शकतील. कंपनीनं सोमवारी एक व्हिडीओ शेयर केला ज्यात एक रिकाम्या कॉकपिटचा वापर करण्यात आला होता. मानवयुक्त फ्लाइंग टेस्ट मुळात जुलै 2021 मध्ये आयोजित करण्यात आली होती.
या मॉर्डन डिजाइन पॅसेंजर व्हेईकलमध्ये दोन पॅसेंजरसाठी जागा आहे, ज्यात आठ फॅन उपलब्ध आहेत. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, या फ्लाइंग व्हेईकलचा टॉप स्पीड 130KMpH असू शकतो. हे देखील वाचा: या आठवड्यात रेडमी करणार धमाका! अत्यंत कमी किंमतीत भारतात लाँच होईल Redmi A1+ स्मार्टफोन
फ्लाइंग टॅक्सी: एयरोप्लेन आणि हेलीकॉप्टरपेक्षा किती वेगळी आहे?
फ्लाइंग टॅक्सी पॉइंट टू पॉइंट पिकअप आणि ड्रॉप फॅसिलिटी ऑफर करते. सर्व एयरोप्लेन्सना टेक ऑफ आणि लँडिंगसाठी एयरपोर्टची आवश्यकत असते. तसेच हेलीकॉप्टर वर्टिकली टेक ऑफ आणि लँड होतात, त्यासाठी एक हेलिपॅड किंवा मोकळी जागा ठरलेली असते. ही इलेक्ट्रिक फ्लाइंग व्हेईकल कुठेही वर्टिकल लँड आणि टेक ऑफ करू शकतं. ई-फ्लाइंग टॅक्सी सेफ, क्विक, फास्ट आणि पर्यावरणपूरक डिजाइनसह तयार करण्यात आली आहे.
फ्लाइंग टॅक्सीची वाट बघावी लागेल
फ्लाइंग टॅक्सी अजूनही सुरुवातीच्या टप्प्यात आहेत. त्यामुळे फ्लाइंग टॅक्सी उद्योगापुढे अनेक अडचणींचा डोंगर उभा आहे, ज्यात बॅटरी बॅकअप, सिक्योरिटी प्रॉब्लम, एरियल ट्रॅफिक कंट्रोल आणि इंफ्रास्ट्रक्चर सारख्या मूलभूत गरजांचा देखील समावेश आहे. तसेच ही सर्व्हिस अफोर्डेबल बनवणं देखील खूप आवश्यक आहे. हे देखील वाचा: नोकियाची कमाल! 12 हजारांत 50MP Camera आणि 5,000mAh Battery सह Nokia G11 Plus भारतात लाँच
लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठीला Facebook वर फॉलो करा.













