या आठवड्यात रेडमी करणार धमाका! अत्यंत कमी किंमतीत भारतात लाँच होईल Redmi A1+ स्मार्टफोन

Redmi A1+ India Launch: Xiaomi सब-ब्रँड Redmi नं काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारात आपल्या ‘ए’ सीरीज अंतगर्त Redmi A1 स्मार्टफोन लाँच केला होता. हा एक लो बजेट मोबाइल फोन आहे, रेडमी ए1 ची प्राइस 6,499 रुपये आहे. आता कंपनीनं घोषणा केली आहे की रेडमी ब्रँड आपल्या या सीरीजचा विस्तार करत येत्या 14 ऑक्टोबरला Redmi A1+ स्मार्टफोन भारतात लाँच करणार आहे. रेडमी ए1 प्लस देखील एक स्वस्त स्मार्टफोन असेल जो एंट्री लेव्हल मोबाइल फोन म्हणून भारतात लाँच होईल.

Redmi A1 Plus Launch

शाओमी इंडियानं घोषणा करून सांगितलं आहे की कंपनी येत्या 14 ऑक्टोबरला भारतीय बाजारात आपला नवीन मोबाइल फोन रेडमी ए1+ लाँच करेल. हा एक लो बजेट स्मार्टफोन असेल जो वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले तसेच ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. फोनचं प्रोडक्ट पेज देखील लाइव्ह करण्यात आलं आहे. आशा आहे की Redmi A1+ Price 8,000 रुपयांच्या आसपास असू शकतो. परंतु फोन रेडमी ए1 प्लसच्या अधिकृत किंमत व अन्य डिटेल्ससाठी 14 ऑक्टोबरची वाट पाहावी लागेल. हे देखील वाचा: फक्त 999 रुपयांमध्ये बुक करा दमदार Electric Scooter; 15 हजारांच्या डिस्काउंटसह तीन मॉडेल उपलब्ध

Redmi A1 Plus Launch Details With Price And Leaked Specifications

Redmi A1+ Specifications

लीक्स नुसार, हा रेडमी मोबाइल 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर सादर केला जाईल जो 1600 x 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.52 इंचाच्या एचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेला सपोर्ट करेल. ही स्क्रीन 120हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट तसेच 400निट्स ब्राइटनेस सारख्या फीचर्सना सपोर्ट करेल.

Redmi A1+ अँड्रॉइड 12 वर लाँच होईल ज्यात प्रोसेसिंगसाठी मीडियाटेक हीलियो ए22 चिपसेट मिळेल असं सांगण्यात आलं आहे. लीकनुसार हा मोबाइल 2GB LPDDR4X RAM ला सपोर्ट करेल तसेच फोनमध्ये 32 जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. हा मोबाइल फोन ड्युअल सिम, वीओवायफाय, ब्लूटूथ 5.0 तसेच 2.4गीगाहर्ट्ज वायफायला सपोर्ट करेल. हे देखील वाचा: 180GB डेटा आणि मोफत OTT सह या कंपनीचा पैसा वसूल प्लॅन; 90 दिवस अनलिमिटेड कॉलिंग

रेडमी ए1प्लसच्या बॅक पॅनलवर 8 मेगापिक्सलचा सिंगल रियर कॅमेरा सेन्सर तसेच फ्रंट पॅनलवर 5 मेगापिक्सलचा कॅमेरा कॅमेरा असल्याचं लीकमध्ये समोर आलं आहे. पावर बॅकअपसाठी Redmi A1+ मध्ये 10 वॉट चार्जिंग सपोर्ट असलेली 5,000एमएएच बॅटरी मिळू शकते. भारतीय बाजारात हा फोन black, light blue आणि light green कलरमध्ये सेलसाठी उपलब्ध होऊ शकतो.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठीला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here