Nokia G11 Plus India Launch: HMD Global नं आज नोकिया ब्रँडचा नवीन स्मार्टफोन नोकिया जी11 प्लस भारतात लाँच केला आहे. हा नोकिया मोबाइल 50MP Camera, 90Hz Display, 4GB RAM आणि 5,000mAh Battery सारख्या स्पेसिफिकेशन्सना सपोर्ट करतो तसेच Nokia G11 Plus Price 12,499 रुपये आहे. या किंमतीत हा नोकिया फोन OPPO A17 आणि Vivo Y16 ला थेट आव्हान देतो. नोकिया जी11 प्लस स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सची संपूर्ण माहिती पुढे देण्यात आली आहे.
Nokia G11 Plus
नोकिया जी11 प्लसचे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 20:9 अॅस्पेक्ट रेशियोवर सादर झाला आहे जो 720 x 1600 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.517 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. या नोकिया फोनची स्क्रीन 90हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटवर चालते. Nokia G11 Plus ची बॉडी पॉलीकॉर्बोनटपासून बनवण्यात आली आहे ज्याचे डायमेंशन 8.55×164.8×75.9एमएम आणि वजन 192ग्राम आहे. हे देखील वाचा: फक्त 999 रुपयांमध्ये बुक करा दमदार Electric Scooter; 15 हजारांच्या डिस्काउंटसह तीन मॉडेल उपलब्ध
Nokia G11 Plus अँड्रॉइड 12 वर लाँच झाला आहे, ज्याला 2 वर्ष ओएस अपडेट मिळेल. म्हणजे लवकरच हा नोकिया मोबाइल अँड्रॉइड 13 वर देखील अपडेट होईल. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये Unisoc T606 चिपसेट मिळतो. नोकिया जी11 प्लस स्मार्टफोन 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. फोनमध्ये 512जीबी पर्यंतच्या मायक्रोएसडी कार्डचा वापर करता येईल.
नोकिया जी11 प्लस फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे, जोडीला 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर मिळतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या नोकिया मोबाइल फोनमध्ये एफ/2.0 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हे देखील वाचा: 180GB डेटा आणि मोफत OTT सह या कंपनीचा पैसा वसूल प्लॅन; 90 दिवस अनलिमिटेड कॉलिंग
Nokia G11 Plus एक ड्युअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईवर चालतो. 3.5एमएम जॅक सोबतच फोनमध्ये अन्य बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स देखील देण्यात आले आहेत. हा फोन आयपी52 रेटिंगसह आला आहे त्यामुळे हा वॉटरप्रूफ बनतो. पावर बॅकअपसाठी नोकिया जी11 प्लस मध्ये 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे जी 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते. नोकिया जी11 प्लस भारतात 12,499 रुपयांमध्ये Lake Blue आणि Charcoal Grey कलरमध्ये विकत घेता येईल.
लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठीला Facebook वर फॉलो करा.