फेब्रुवारी मध्ये टेक कंपनी सोनी ने एक्सपीरिया सीरीज ला पुढे नेत आपल्या फ्लॅगशिप अंतर्गत दोन नवीन स्मार्टफोन सादर केले होते. सोनी ने मोबाईल वर्ल्ड कांग्रेस 2018 च्या मंचावरून एक्सपीरिया एक्सझेड2 आणि एक्सपीरिया एक्सझेड2 कॉम्पेक्ट टेक बाजारा समोर सादर केले होते. आज सोनी ने आपला हाईएंड डिवाईस एक्सपीरिया एक्सझेड2 भारतात लॉन्च केला आहे. इंडियन मार्केट मध्ये हा स्मार्टफोन 72,990 रुपयांमध्ये आणला गेला आहे जो येत्या 1 ऑगस्ट पासून सेल साठी उपलब्ध होईल.
सोनी एक्सपीरिया एक्सझेड2
डिजाईन व डिस्प्ले
सोनी एक्सपीरिया एक्सझेड2 ची सर्वात मोठी खासियत ही आहे की हा सोनी चा पहिला असा स्मार्टफोन आहे जो 18:9 आस्पेक्ट रेशियो सह सादर करण्यात आला आहे. हा फोन ग्लास सँडविच डिजाईन वर बनला आहे ज्याच्या बॅक आणि फ्रंट दोन्ही पॅनल्स वर ग्लास आहे. फोन फर्स्ट लुक मध्येच प्रीमियम वाटतो. एक्सपीरिया एक्सझेड2 मध्ये 1080 x 2160 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 5.7-इंचाचा फुलएचडी+ एचडीआर डिस्प्ले देण्यात आला आहे जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टेड आहे. कंपनी ने फोन आईपी68 रेटिंग सह बाजारात आणला आहे.
ओएस व हार्डवेयर
सोनी एक्सपीरिया एक्सझेड2 लेटेस्ट एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम एंडरॉयड 8.0 ओरियो आधारित आहे. 64बिट आॅक्टा-कोर प्रोसेसर सह हा फोन क्वालकॉम च्या सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगन 845 वर चालतो. ग्राफिक्स साठी फोन मध्ये ऐड्रीनो 630 आहे. एक्सपीरिया एक्सझेड2 मध्ये 6जीबी रॅम देण्यात आला आहे. हा फोन 64जीबी इंटरनल स्टोरेज ला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्ड ने 400जीबी पर्यंत वाढवता येते.
कॅमेरा
सोनी चा हा फोन जगातील पहिला असा स्मार्टफोन आहे जो 4के एचडीआर क्वॉलिटी चे वीडियो रेकॉर्ड करण्यास सक्षम आहे. तसेच हा 960एफपीएस च्या स्पीड ने फुलएचडी स्लो मोशन वीडियो पण रेकॉर्ड करू शकतो. फोटोग्राफी साठी या फोन च्या रियर पॅनल वर एफ/2.0 अपर्चर वाला 19-मेगापिक्सल चा मोशन आई कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तर सेल्फी व वीडियो कॉलिंग साठी एक्सपीरियो एक्सझेड2 मध्ये एफ/2.0 अपर्चर वाला 5-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे.
कनेक्टिविटी आणि सिक्योरिटी
सोनी एक्सपीरिया एक्सझेड2 रियर डुअल सिम फोन आहे जो 4जी नेटवर्क वर चालतो. यात वाईफाई, ब्लूटूथ, एनएफसी, ग्लोनॉस व यूएसबी टाईप-सी सारखे फीचर्स आहेत. सिक्योरिटी साठी फोन च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन 3डी सेंसिंग टेक्नोलॉजी सह फेस अनलॉक फीचर ला पण सपोर्ट करतो.
बॅटरी
सोनी एक्सपपीरिया एक्सझेड2 मध्ये पावर बॅकअप साठी 3,180एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी क्वालकॉम च्या क्वीकचार्ज 3.0 टेक्नॉलजी सह येते. फोन ची बॅटरी स्मार्ट स्टेमिना मोड ला सपोर्ट करते जो बॅटरी चा वापर खुप कमी करतो. तसेच सोनी चा फोन वायरलैस चार्जिंग ला पण सपोर्ट करतो.
















