सॅमसंग गॅलेक्सी नोट 9 फ्लिपकार्ट वर झाला लिस्ट, 19 ऑगस्ट पासून होऊ शकते अगस्त से हो सकती है प्री-बुकिंग शुरू

91मोबाईल्सने एक आठवड्यापूर्वी आपल्या एक्सक्लूसिव रिपोर्ट मध्ये सांगितले होते की दिग्गज टेक कंपनी सॅमसंग ऑगस्ट च्या 19 तारखेला आपला आगामी हाईएंड फ्लॅगशिप डिवाईस गॅलेक्सी नोट 9 भारतात सादर करेल. हा डिवाईस 9 ऑगस्ट ला ग्लोबल मंचावरून लॉन्च होईल तसेच 10 दिवसानंतर 19 ऑगस्ट पासून भारतात प्री-बुकिंग साठी उपलब्ध होईल. आता देशातील प्रसिद्ध शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर सॅमसंग गॅलेक्सी नोट 9 चा प्रोडक्ट पेज पण बनवण्यात आला आहे. या पेज वरून स्पष्ट झाले आहे की सॅमसंग चा नेक्स्ट नोट फ्लिपकार्ट एक्सक्लूसिव असेल.

फ्लिपकार्ट ने सॅमसंग गॅलेक्सी नोट 9 चा स्पेशल वेबपेज बनवाला आहे ज्यावर फोन च्या ग्लोबल लॉन्च ची तारीख म्हणजे 9 ऑगस्ट लिहिण्यात आली आहे. वेबपेज वरून हे कन्फर्म झाले आहे की फ्लिपकार्ट फोन चा लॉन्च ईवेंट आपल्या वेबसाइट वर लाईव दाखवणार आहे तर दुसरीकडे भारतात फोन चा सेल फ्लिपकार्ट वरून होईल हे देखील स्पष्ट झाले आहे. या वेबपेज वरून फोन च्या मोठया स्टोरेज, पावरफुल बॅटरी बॅकअप आणि दमदार प्रोसेसिंग चा खुलासा करण्यात आला आहे.

गॅलेक्सी नोट 9 चे स्पेसिफिकेशन्स फ्लिपकार्ट वर दिसत नाहीत पण 3 वेगवेगळ्या वीडियोज वरून फोन च्या स्टोरेज, बॅटरी व चिपसेट च्या पावर चा अंदाज लावता येतो. विशेष म्हणजे 9 ऑगस्ट ला सॅमसंग न्यूयॉर्क मध्ये ईवेंट चे आयोजन करून गॅलेक्सी नोट 9 ग्लोबल मंचावर लॉन्च करेल. तसेच आम्हाला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा फोन 19 ऑगस्ट पासून भारतात प्री-बुकिंग साठी उपलब्ध होईल तसेच सप्टेंबर च्या पहिल्या आठवड्यापासून याचा सेल सुरू होईल. मिळालेल्या माहितीनुसार सॅमसंग गॅलेक्सी नोट 9 ची प्राइस जवळपास 72,990 रुपये असू शकते.

सॅमसंग गॅलेक्सी नोट 9 चे स्पेसिफिकेशन पाहता आता पर्यंत आलेल्या लीक्स नुसार हा फोन 18.5:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या क्यूएचडी+ डिस्प्ले सह सादर केला जाऊ शकतो. 161.9 x 76.3एमएम डायमेंशन सह या फोन ची जाडी 8.8एमएम असू शकते तसेच फोन 6.3-इंचाच्या स्क्रीन सह सादर केला जाईल. सॅमसंग गॅलेक्सी नोट 9 बद्दल बोलले जात आहे की हा फोन वेगवेगळ्या बाजारांमध्ये एक्सनॉस 9810 किंवा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट वर चालेल.

गॅलेक्सी नोट 9 मध्ये 6जीबी रॅम मेमरी मिळू शकते. तसेच फोन मध्ये 128जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते. गॅलेक्सी नोट 9 मध्ये हॉरिजेंटल शेप चा डुअल रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो त्याचबरोबर फोन च्या मागच्या बाजूला फिंगरप्रिंट सेंसर मिळू शकतो. तसेच पावर बॅकअप साठी या डिवाईस मध्ये 4,000एमएएच ची मोठी बॅटरी दिली जाऊ शकते.

सॅमसंग च्या गॅलेक्सी नोट सीरीज ची ओळख असलेला स्टायलस म्हणजे एसपेन पण यावेळी कंपनी ने आधीपेक्षा जास्त एडवांस व हाईटक केला आहे. बोलले जात आहे की सॅमसंग यावेळी एसपेन ब्लूटूथ​ कनेक्टिविटी सह सादर करेल. जेस्चर कंट्रोल वापरून एसपेन ने फोन चे म्यूजिक कंट्रोल केले जाऊ शकते, गॅलेरी एक्सेस करता येईल तसेच हा टाइमर प्रमाणे पण वापरता येइल.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here