4जीबी रॅम आणि डुअल कॅमेरा सह लॉन्च झाला सॅमसंग गॅलेक्सी आॅन8, 6 ऑगस्ट पासून फ्लिपकार्ट वर होईल सेल

सॅमसंग बद्दल गेल्या आठवड्यात आम्ही बातमी दिली होती की कपंनी ऑगस्ट च्या पहिल्या आठवड्यात आपल्या गॅलेक्सी आॅन सीरीज मध्ये नवीन स्मार्टफोन म्हणून गॅलेक्सी आॅन8 लॉन्च करू शकते. त्यानुसार आज सॅमसंग इंडिया ने हा फोन समोर आणला आहे आणि गॅलेक्सी आॅन8 भारतीय बाजारात सादर केला आहे. सॅमसंग ने गॅलेक्सी आॅन8 स्मार्टफोन 16,990 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे जो 6 ऑगस्ट पासून सॅमसंग आॅनलाईन शॉप सह ईकॉमर्स साइट फ्लिपकार्ट वर एक्सक्लूसिव सेल साठी उपलब्ध होईल.

सॅमसंग गॅलेक्सी आॅन8 बद्दल बोलायचे तर हा फोन पॉलीकार्बोनेट यूनिबॉडी डिजाईन वर बनला आहे हा 18.5:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या इनफिनिटी डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. फोन मध्ये तुम्हाला 6-इंचाची एचडी+ सुपर एमोलेड स्क्रीन मिळू शकते. हा फोन एंडरॉयड 8.0 ओरियो आधारित आहे तसेच आॅक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन ​ 450 चिपसेट वर चालतो.

कंपनी ने गॅलेक्सी आॅन8 मध्ये 4जीबी रॅम दिला आहे. फोन मध्ये 64जीबी इंटरनल स्टोरेज आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने 256जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता गॅलेक्सी आॅन8 च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात एफ/1.7 अपर्चर वाला 16-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि एफ/1.9 अपर्चर वाला 5-मेगापिक्सलचा सेकेंडी कॅमेरा सेंसर आहे.

सॅमसंग ने सेल्फी साठी गॅलेक्सी आॅन8 मध्ये एफ/1.9 अपर्चर वाला 16-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा दिला आहे. सॅमसंग चा हा फोन डुअल सिम सोबत 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक ​कनेक्टिविटी फीचर्स सह फोन च्या बॅक पॅनल वर सिक्योरिटी साठी फिंगर​प्रिंट सेंसर देण्यात आला आहे. तर पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 3,500एमएएच ची बॅटरी आहे.

सॅमसंग गॅलेक्सी आॅन8 ब्लू आणि ब्लॅक कलर वेरिएंट मध्ये 16,990 रुपयांमध्ये 6 ऑगस्ट पासून विकत घेता येईल. फ्लिपकार्ट या स्मार्टफोनला नो कॉस्ट ईएमआई, स्पेशल डेटा आॅफर आणि अनेक आर्कषक डील सह सेल साठी लिस्ट करेल.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here