टेक कंपनी सॅमसंग ने काल अंर्तराष्ट्रीय मंचावरून आपले दोन नवीन डिवाईस सादर केले आहेत. सॅमसंग ने न्यूयार्क मध्ये एका ईवेंट चे आयोजन केले होते ज्यातून गॅलेक्सी टॅब एस4 आणि गॅलेक्सी टॅब ए 10.5-इंच पहिल्यांदाच जगासमोर आणण्यात आले आहेत. सॅमसंग ने आपले हे दोन्ही डिवाईस आॅफिशियल केले आहेत जे येत्या काही दिवसांत वेगवेगळ्या मार्केट्स मध्ये सेल साठी उपलब्ध होतील. सॅमसंग गॅलेक्सी टॅब एस4 च्या फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची (इथे क्लिक करून) माहिती मिळवू शकता. तर सॅमसंग गॅलेक्सी टॅब ए 10.5-इंचचे स्पेसिफिकेशन्स खालील प्रमाणे आहेत.
नावावरून समजले असेलच की सॅमसंग ने आपल्या टॅब ए सीरीज मध्ये सादर केलेल्या या डिवाईस ला 16:10 आस्पेक्ट रेशियो वाल्या डिस्प्ले सह सादर केले आहे जो 1920 x 1200 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 10.5-इंचाच्या मोठया टीएफटी एलसीडी स्क्रीन ला सपोर्ट करतो. नवीन टॅब लेटेस्ट एंडरॉयड वर्जन सह सादर झाला आहे सोबतच हा क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट वर चालतो. हा डिवाईस वायफाय आॅनली तसेच एलटीई मॉडेल मध्ये सादर करण्यात आला आहे.
सॅमसंग ने गॅलेक्सी टॅब ए 10.5-इंच 3 जीबी रॅम सह सादर केले आहे. या फोन मध्ये 32जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने वाढवता येईल. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता गॅलेक्सी टॅब ए 10.5-इंच च्या बॅक पॅनल वर 8-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तर सेल्फी साठी या फोन मध्ये 5-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. चांगल्या फोटोग्राफी साठी कॅमेरा सेटअप सोबत फ्लॅश लाईट देण्यात आली आहे.
सॅमसंग गॅलेक्सी टॅब ए 10.5-इंच मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स आहेत त्याचबरोबर दमदार साउंड क्वालिटी साठी यात डॉल्बी एटमॉस वाले क्वॉड स्पीकर देण्यात आले आहेत. कंपनी ने आपला डिवाईस किड्स मोड आणि पॅरंटल कंट्रोल फीचर सह सादर केला आहे सोबत 8 चिल्ड्रन अॅप पण मोफत देण्यात आले आहेत. सॅमसंग च्या स्मार्टथिंग फीचर सोबत या डिवाईस मध्ये पावर बॅकअप साठी 7,300एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.
गॅलेक्सी टॅब ए 10.5-इंच ब्लू, ब्लॅक आणि ग्रे कलर वेरिएंट मध्ये सादर करण्यात आला आहे. किंमत पाहता सॅमसंग ने गॅलेक्सी टॅब ए 10.5-इंच च्या वाईफाई ओनली वेरिएंट 330 यूरो मध्ये लॉन्च केला आहे जी भारतीय करंसी नुसार जवळपास 26,330 रुपये आहे. तर नवीन टॅब चा एलटीई मॉडेल 390 यूरो म्हणजे भारतीय करंसी नुसार जवळपास 31,000 रुपयांमध्ये सादर करण्यात आला आहे.















