घरबसल्या मोफत करा Mobile Repairing Course, महिन्याला कमवा 25 ते 30 हजार

सर्वाधिक Mobile Phone युजर्स असलेल्या देशांच्या यादीत भारताचे नाव टॉपला आहे. इथे प्रत्येक घरात मोबाइल फोन आहे आणि जवळपास प्रत्येक व्यक्ती Smartphone वापरत आहे. जर या मोबाइल फोन्समध्ये एखादी समस्या आली तर आपण थेट सर्व्हिस सेंटर आणि मोबाइल रिपेयर शॉपवर जातो. किती खर्च येईल याचा विचार करूनच भीती वाटते. परंतु तुम्ही कधी मोबाइल रिपेयरिंग शिकण्याचा विचार केला आहे का? आणि तेही अगदी 1 रुपये देखील खर्च न करता? तुम्हाला माहित आहे का तुम्ही पैसे खर्च न करता मोबाइल रिपेयरिंग कोर्स पूर्ण करू शकता तसेच Mobile Repairing Course नंतर महिन्याला 25,000 ते 30,000 रुपयांची कमाई देखील करू शकता.

Mobile Repairing Course

मोबाइल रिपेयरिंग कोर्स भारत सरकारद्वारे आणण्यात आला आहे, जिथे खूप कमी पैसे देऊन तुम्ही सर्टिफिकेट मिळवू शकता. हा सरकारी कोर्स Skill India (स्कील इंडिया) मोहिमेअंतर्गत उपलब्ध आहे ज्यात कोणीही सहभागी होऊ शकतं. सरकारी मोबाइल रिपेयरिंग कोर्समध्ये भाग घेणं सोपं आहे आणि यासाठी घर बसल्या ऑनलाइन अप्लाय करता येतं. पुढे आम्ही How to Apply for Mobile Repairing Course म्हणजे स्कील इंडिया अंतगर्त मोबाइल रिपेयरिंग कोर्ससाठी कसं अप्लाय करायचं, याची माहिती दिली आहे. हे देखील वाचा: PM Kisan Scheme: लवकरच येतोय 13 वा हप्ता; ऑनलाइन पूर्ण करा KYC, पाहा लाभार्थ्यांची यादी

मोबाइल रिपेयरिंग कोर्सचे फायदे

  • हा एक शॉर्ट टर्म कोर्स आहे काही तासांच्या हिशोबाने पूर्ण करता येतो.
  • या कोर्ससाठी फिक्स शेड्यूल असलेल्या कॉलेजमध्ये जाण्याची गरज नाही.
  • कोर्स पूर्ण केल्यानंतर 25 ते 30 हजार रुपयांची दरमहा कमाई करता येईल.
  • Mobile Repairing Course केल्यानंतर तुम्ही तुमचा लघु उद्योग सुरु करू शकता.
  • Skill India अंतगर्त सरकारकडून आर्थिक मदत देखील मिळते.

मोफत करा Mobile Repairing Course

Skill India वर करा रजिस्टर

1) सर्वप्रथम Skill India की वेबसाइटवर जा, यासाठी (इथे क्लिक करा)

2) इथे तुम्हाला एनरोल करावं लागेल. यासाठी ‘Enroll Now’ बटनवर क्लिक करा.

3) नवीन युजरला स्कील इंडिया वेबसाइटवर रजिस्ट्रर करावं लागेल, यासाठी साइन अप बटनवर क्लिक करा.

4) इथे नाव, मोबाइल नंबर, ईमेल आयडी, लिंग, जन्मतारीख तसेच राज्य तसेच पासवर्डची निवड करा.

5) सर्व डिटेल्स टाकल्यानंतर National Skill Development Corporation (NSDC) च्या नियम व अटी मान्य करून सबमिट करा.

6) सबमिट केल्यावर तुमच्या ईमेल आयडी वर e-Skill India platform – User Registration चा कंफर्मेशन मेल येईल.

हे देखील वाचा: प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! तुमची ट्रेन कुठे आहे हे पाहा मोबाइलवर, जाणून घ्या सोपी पद्धत

Mobile Repairing Course साठी करा अप्लाय

1) स्कील इंडियावर रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यावर Mobile Repairing कोर्ससाठी Enroll करा.

2) म्हणजे वेबसाइट तुम्हाला नॉलेज पार्टनर पोर्टलवर घेऊन जाईल, समोर आलेल्या विंडो मध्ये ‘ओके’ प्रेस करा.

3) इथे डिजीटल कंटेट उपलब्ध होईल. बेसिक मोबाइल रिपेयर कोर्स मध्येकमीत कमी दोन मॉड्यूल तुम्हाला पूर्ण करावे लागतील.

4) Module 1 मध्ये मोबाइल रिपेयरिंगमध्ये वापरल्या जाणाऱ्या अवजारांची ओळख, वापर मेंटेनन्स इत्यादी गोष्टी सांगितल्या जातील.

5) Module 2 मध्ये मोबाइल फोन्स ऑपरेट करणं, मोबाइल पीसीबीची माहिती आणि मोबाइल्समध्ये येणारे फॉल्ट्स शोधणे तसेच त्यावरील उपायांची ट्रेनिंग दिली जाईल.

6) भारत सरकार द्वारे हा कोर्स पूर्णपणे मोफत दिला जात आहे तसेच यासाठी कोणतेही शुल्क देण्याची गरज नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here