VI च्या ग्राहकांसाठी अच्छे दिन; कंपनी मोफत देतेय अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंग

Vodafone Idea (Vi) नं आपल्या ग्राहकांना सरप्राइज देत ट्रूली अनलिमिटेड इंटरनॅशनल रोमिंग पॅक लाँच केला आहे, ज्याचा फायदा वोडाफोन आयडियाच्या त्या ग्राहकांना मिळेल जे या Holiday Season दरम्यान परदेशात जाण्याची योजना बनवत आहेत. कंपनीच्या नव्या पॅकमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड व्हॉइस (Unlimited Voice) आणि डेटा (Data) चा लाभ मिळेल. कंपनीनं दावा केला आहे त्यांच्या इंटरनॅशनल रोमिंग (IR) पॅकमध्ये कोणतीही छुपी अट नाही, त्यामुळे युजर्सना रोमिंग दरम्यान डेटा संपल्यावर स्पीड कमी होण्याचं टेंशन नसेल. याचा अर्थ असा की युजर्सना इंटरनॅशनल रोमिंग दरम्यान अमर्याद डेटा अ‍ॅक्सेस मिळेल.

28 दिवस मिळेल फ्री सेवा

वोडाफोन-आयडियानं हे इंटरनॅशनल रोमिंग पॅक पोस्टपेड (Postpaid) युजर्ससाठी सादर केले आहेत. यात युजर्सना 24 तासांपासून 28 दिवसांपर्यंतची वॅलिडिटी दिली आहे. विशेष म्हणजे वैधता वगळता जवळपास सर्वच बेनिफिट्स सारखे आहेत. या पॅकच्या माध्यमातून युजर्स लोकप्रिय टूरिस्ट डेस्टिनेशनवर आपल्या सुट्ट्यांचा आनंद घेऊ शकतात. हे देखील वाचा: बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी येतोय स्वदेशी LAVA X3; दमदार फीचर्ससह किंमत 7 हजारांच्या बजेटमध्ये

इतकी आहे किंमत

वोडाफोन-आयडियाचे हे इंटरनॅशनल रोमिंग पॅक पोस्टपेड (Postpaid) युजर्ससाठी सादर करण्यात आले आहेत. यात युजर्सना 24 तासांपासून 28 दिवसांपर्यंत वॅलिडिटी ऑफर केली जात आहे. यांची किंमत 599, 2999, 3999, 4499 आणि 5999 आहे, ज्यात अनुक्रमे 24 तास, 7 दिवस, 10 दिवस 14 दिवस आणि 28 दिवसांची वैधता मिळते. सर्वात मोठा प्लॅन वगळता इतर प्लॅन्समध्ये डेटा आणि लोकल व इंडियन कॉल्स अमर्याद मोफत आहेत. तर सर्व प्लॅन्समध्ये मोफत अमर्याद इनकमिंग आणि एसएमएस मोफत मिळतात.

आगामी क्रिसमस आणि न्यू ईयर पाहता विआयनं आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या युजर्ससाठी IR पॅक्स सादर केले आहेत. Vi नं यासाठी या देशातील नेटवर्क सर्व्हिस प्रोव्हायडर्स सोबत भागेदारी केली आहे, जेणेकरून भारतीय युजर्सना परदेशात चांगली कनेक्टिव्हिटी मिळू शकेल. इतकेच नव्हे तर Vi पोस्टपेड रोमिंग पॅक्ससह ऑल्वेज ऑन फीचर देखील कंपनीनं दिलं आहे, त्यामुळे पॅक संपल्यावर देखील युजर्सना इंटरनॅशनल रोमिंग दरम्यान एक्सट्रा चार्ज द्यावे लागणार नाहीत. हे देखील वाचा: एकरकमी 5,580 रुपये देऊन घरी आणा रेडमीचा ए वन फोन! Redmi A1 वर मोठा डिस्काउंट

या देशांमध्ये मिळेल फ्री रोमिंग सुविधा

वोडाफोन-आयडिया युजर्सना एक IR पॅकचं सब्सक्रिप्शन घेतल्यावर 81 देशांमध्ये फ्री रोमिंगची सुविधा मिळेल. 81 देशांच्या यादीत यूएस, यूके, यूएई, मलेशिया, सिंगापूर, चेक रिपब्लिक, जर्मनी, ग्रीस, हंगरी, थायलंड, फ्रांस, ऑस्ट्रेलिया, हॉंगकॉंग, आयर्लंड, इटली, नेदरलँड, पुर्तगाल, रोमानिया, स्पेन, तुर्की, न्यूजीलँड, ब्राजील आणि इंडोनेशिया सारख्या देशांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here