अ‍ॅमेझॉनवर लिस्ट झाला स्वदेशी LAVA X3; लवकरच येऊ शकतो बाजारात

लावानं काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारात Lava Blaze 5G फोन लाँच केला होता. हा India’s most affordable 5G smartphone म्हणजे भारतातील सर्वात स्वस्त 5जी फोन असून जो 10,999 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध आहे. या 5जी फोन नंतर कंपनीनं 7,799 रुपयांचा Lava Yuva Pro देखील लाँच केला आहे. परंतु आता असं वाटतंय की ही स्वदेशी मोबाइल कंपनी स्वस्त स्मार्टफोन्सची मालिका थांबवणार नाही. लावा आणखी एका लो बजेट मोबाइल फोन LAVA X3 वर काम करत आहे जो लवकरच भारतात लाँच होऊ शकतो. हा स्वस्त स्मार्टफोन अ‍ॅमेझॉन इंडियावर फोटो आणि स्पेसिफिकेशन्ससह लिस्ट झाला आहे.

LAVA X3 भारतीय लाँच

लावा एक्स3 स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच होऊ शकतो. या मोबाइल फोनची मायक्रोसाइट अ‍ॅमेझॉन इंडियावर लाइव्ह करण्यात आली आहे जिथे LAVA X3 च्या फोटो सोबतच याचे स्पेसिफिकेशन्स देखील दिसत आहेत. इथे फोनच्या प्रोडक्ट पेजवर ‘कमिंग सून’ लिहिण्यात आलं आहे. या स्मार्टफोनची लाँच डेट समोर आली नसली तरी लावा एक्स3 अ‍ॅमेझॉनवर सेलसाठी उपलब्ध होईल, हे स्पष्ट झालं आहे. हे देखील वाचा: एकरकमी 5,580 रुपये देऊन घरी आणा रेडमीचा ए वन फोन! Redmi A1 वर मोठा डिस्काउंट

LAVA X3 चे लीक स्पेसिफिकेशन्स

अ‍ॅमेझॉन इंडियानं लावा एक्स3 च्या स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे. मायक्रोसाइटनुसार हा स्मार्टफोन 6.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेसह लाँच होऊ शकतो. फोनची स्क्रीन ‘यू’ शेप वॉटरड्रॉप नॉच स्टाईलसह आयपीएस पॅनलसह येऊ शकते. डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस दाखवण्यात आल्या आहेत तर खाली रुंद चिन पार्ट दिला जाऊ शकतो.

LAVA X3 स्मार्टफोन अँड्रॉइड 12 गो एडिशन वर लाँच होऊ शकतो. या मोबाइलमध्ये 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टा कोर प्रोसेसरसह मीडियाटेक हीलियो चिपसेट दिला जाऊ शकतो. परंतु SoC (system-on-a-chip) कोणती असेल हे स्पष्ट झालं नाही. तसेच अ‍ॅमेझॉनवर लावा एक्स3 मध्ये 3जीबी रॅम असेल असं सांगण्यात आलं आहे जोडीला 32 जीबी इंटरनल स्टोरेज मिळू शकते.

फोटोग्राफीसाठी हा स्वस्त लावा मोबाइल ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करू शकतो जो बॅक पॅनलवर डावीकडे मिळू शकतो. या बॅक कॅमेरा सेटअपमध्ये फ्लॅश लाईटसह 8 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि जोडीला एआय लेन्स मिळू शकते. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी LAVA X3 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करू शकतो. हे देखील वाचा: भारतातील सर्वात स्वस्त 5जी स्मार्टफोनची लाँच डेट समजली; इतकी असू शकते JioPhone 5G ची किंमत

LAVA X3 च्या बॅक पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर मिळू शकतो. लावा एक्स3 4जी फोन असेल ज्यात ड्युअल सिमचा सपोर्ट असण्याची शक्यता आहे. या फोनच्या बॅटरीची माहिती समोर आली नाही. अ‍ॅमेझॉनवर सर्व माहिती मिळाल्यामुळे आशा आहे की येत्या काही दिवसांमध्ये लावा एक्स3 भारतात लाँच होईल. LAVA X3 ची प्राइस 8,000 रुपयांपेक्षा कमी असेल अशी अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here